नाशिक : चांदवड शहर परिसरात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यास तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून टोलनाका व्यवस्थापकाकडून कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.
देशभरात काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (Independence) उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच नाशिकच्या चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याची घटना घडली. त्यामुळे टोलनाक्यावर काम करत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना आश्चर्य व्यक्त केले. तातडीने स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच टोल प्रशासनाने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित केले आहे. मात्र या घटनेने चांदवड शहरसह परिसरात चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाली आहे.
दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या नाशिकच्या चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावरील कर्मचारी यास तातडीने निलंबित करण्यात आले आहे. टोल नाका व्यवस्थापक मनोज पवार यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे. काल 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत असतांना चांदवडच्या मंगरूळ येथील टोलनाक्यावरील कर्मचारी शेहबाज कुरेशी याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी घोषणा देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.