धर्माबाद (वार्ताहर) येथील बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक अनमोड वसंतराव नागोराव जारीकोटकर यांची सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदी निवड झाल्याने काही दिवसात ते सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
अनमोड वसंतराव हे एस.टी. महामंडळाची सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत या कारणाने त्यांना पदोन्नती मिळणार आहे.
बिलोली येथील आगार प्रमुख एन. एस. निमलवाड, बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशन गावकर, वाहतूक निरीक्षक आ.ज. सोनटक्के, वाहतूक नियंत्रक एस. आर. घंटे, पत्रकार कुणाल पवारे, वाहक एच. आर.डापरवाड, मनोज जोगदंड यांनी अभिनंदन केले आहे.