धर्माबाद (वार्ताहर) येथील उर्दू हायस्कूल चे संस्था चालकांनी आपल्या वडिलांच्या नावे सर्व सोयियुक्त तालुक्यातील पेन्शनर्स साठी प्रशस्त कार्यालय बांधून दिले आहे.त्यांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक तथा पेन्शनर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष म. मीराखानसाहब यांनी संस्थेबद्दल गौरव उद्गार काढले आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेन्शनर्स असोसिएशनचे ता. अध्यक्ष जी.पी.मिसाळे हे होते.धर्माबाद येथील नामांकित उर्दू हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी शिक्षण अधिकारी, पेन्शनर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष म.जब्बारोद्दीन म. वजिरोद्दीन यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तालुक्यातील पेन्शनर्सना ना ते नेहमी आपल्या हायस्कूलमध्ये बैठका घेणे, त्यांची व्यवस्था करणे , भोजन देणे हे नेहमीच करीत असत. ता. अध्यक्ष पदावर असताना त्यांचे निधन झाले म्हणून त्यांचे सुपुत्र तथा संस्थेचे अध्यक्ष म.जावीदो द्दीन म. जब्बारोद्दीन व त्यांचे बंधू तथा उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक म.अजहरोद्दीन म.जब्बारोद्दीन या दोन बंधूंनी तालुक्यातील पेन्शनर्ससाठी वडिलांच्या नावाने प्रशस्त हॉल तथा कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. केवळ तीन महिन्याच्या आत सर्व सोयी युक्त(१५ बाय३० फुटाचा) हॉल, कार्यालयाचा लोकार्पण सोहळा दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मिराखानसाहब यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे. यावेळी ता. कार्यकारणीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे बंधू मुख्याध्यापक यांचा भव्य सन्मान करण्यात आला आहे.याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वेणुगोपाल पंडित यांनी पेन्शनर्सचे शुगर, बीपी, व इतर रोगाची मोफत तपासणी करण्याचे शिबीर घेण्याचे आश्वासन दिले आहे. गटशिक्षणाधिकारी रविशंकर मरकंटे व एसबीआय चे शाखा अधिकारी राजेश रेगुल यांनी पेन्शनर्स चे सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.याप्रसंगी बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर,पे.असो. जिल्हा सचिव चंद्रकांत जटाळ, जि. सदस्य जे.पी. मुंडे नांदेड, एस. के.शेळके नांदेड, माधव निवघेकर, सुभाषराव कुरुडे, साहित्यिक सखारामजी घुले किनवट, संपादक शिवराज पाटील गाडीवान, पत्रकार व संपादक संघाचे ता. अध्यक्ष सतीश शिंदे पाटील यांनी या संस्थेच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि. सदस्य शेख हुसेन चौधरी, शेख गुलाम मुखत्यार कंधार, एस, बी, के. टेंभुर्णीकर, मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, यांची उपस्थिती होती.सत्कारास उत्तर देताना संस्थेचे अध्यक्ष म. जावीदोद्दीन यांनी ता. पेन्शनर्स ची ज्या ज्या वेळी बैठक होईल यावेळी फराळाची ,चहाची व्यवस्था करीनच पण वार्षिक बैठकीच्या सर्व खर्चाची जेवणासह जबाबदारी घेतलेली आहे. मी जिवंत असो वा नसो पण माझ्या वडीला समान असणाऱ्या पेन्शनर्स ची व्यवस्था होईल वचन दिले. त्यांच्या या भावपूर्ण बोलण्याने पेन्शनरच्या डोळ्यात अश्रू आले आणि टाळ्या वाजवून यांचे स्वागत केले आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यादेवी सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करून दीप प्रज्वलित करण्यात आली आहे. ता सचिव कै.जी. बी. पांचाळ व मयतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व सुंदर असे सूत्रसंचालन, भा. स्काऊट गाईडचे माजी जिल्हा सचिव बालाजी कुदाळे सर यांनी केले आहे तर आभार मु.अ. जक्केउद्दीन सर यांनी मानले आहे.कार्यक्रमास पत्रकार मोहम्मद विखार , पत्रकार अब्दुल रज्जाक, सय्यद बाबर, शेख अझरुद्दीन, शंकरराव कामिनवार, श्रीराम गोविंदलवार, सय्यद खय्याम सर, पी. एन.कर्रे, पांचाळ आय. पी., प्रभाकर जोशी, यांची प्रमुख उपस्थिती होती.