धर्माबाद प्रतिनिधी धर्माबाद तालुक्यातील मंगनाळी येथील रहीवासी असणारे गणपत पाटील मंगनाळीकर यांनी अनाथ मुलाचे दोन हाताचे चार हात करण्याचे सामाजिक कार्य गणपत पाटील यांच्या हातून घडले.अनाथ मुलाचे नाव माधव जयराम तेलंगे रा.बारूळ कौठा येथील रहिवासी असून काही वर्षापासून म्हणजे तीन ते पाच वर्षापासून गणपत पाटील मंगनाळीकर यांच्या सहवासात राहून आपली स्वतःची उपजीविका भागून घेत असताना गणपत पाटील मनाळीकर यांना वाटले माधव यांचे विवाह करून टाकावं असं गणपत पाटील यांना वाटत होते. त्यांच्याच माध्यमातून चिकना येथील रहिवाशी कु.भुमिका चंद्रकांत भट्टलवार यांची पिता शेतमजूर असून त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तेव्हा ही सारी परिस्थिती मंगनाळी येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत पाटील मगनाळीकर यांनी दोघांची परीस्थिती समजून घेऊन त्याचे विवाह करण्यात आले. या जोडप्यांना शुभअशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सौ.शोभाबाई संगावार, सौ.अनुराधा तेलगं,सौ.महानंदा सिदकर, गणपत पाटील,बसवेश्वर मोकळीकर, शंकर जाजुलवार, शिवा महाराज बाळापुरकर, महेश धुपे, श्रीकांत आडकेकर , रोहित पाटील, काशिनाथ इंमनेलु, योगेश यडपलवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विवाह संपन्न करण्यात आले.गणपत मंगनाळीकर यांनी वर,वधु चे लग्न लावल्यामुळे अतिशय चांगलं काम केल्यामुळे धर्माबाद तालुक्यात व शहरात त्यांचे कौतुक होत आहे.