धर्माबाद तालुका प्रतिनिधी
धर्माबाद शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ महिला डॉकटर रत्नमाला मॅकलवार यांनी हळदी कुंकवाच्या निमीत्ताने भरपूर ऑक्सिजन निर्मिती करणारे व मानवी आरोग्यास अतीशय उपयुक्त ठरणारे वृक्षाचे झाड वाटप करून एक आगळा वेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
पर्यावरण संतुलित राहून सर्वांना आवश्यक असणारे शुद्ध ऑक्सिजन देणाऱ्या शेकडो वृक्षाचे झाड यावेळी कुंडी सहित भेट म्हणून देण्यात आले आहेत. वृक्ष लागवड करणे त्याचे संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी आहे हे ओळखून आयुर्वेद तज्ज्ञ महिला डॉक्टर रत्नमाला मॅकलवार यांनी हा उपक्रम कृतीत उतरविला आहे.
कोरोनाच्या काळात ऑक्सिजन कमी झाल्यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मनुष्यांची संख्या वाढत आहे पण वृक्षाची संख्या घटत आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून किमान एक वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केल्यास भविष्यात समस्या निर्माण होणार नाही. निसर्गाने आपल्याला अनेक वरदान दिले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्याची जपवणूक करणे तितकेच महत्वाचे आहे असा सूचक संदेश डॉकटर रत्नमाला मॅकलवार यांनी कृतीतून दिला आहे.
या वेळी सुमारे दोनशे पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.
या आगळ्या वेगळ्या पर्यावरण पूरक उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे