धर्माबाद (वार्ताहर) लाईफ लाईन फिटनेस क्लब व शिवजन्मोत्सव च्या वतीने दि.२ जुन रोजी गंगासिटी येथील सुदर्शन मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजार समितीचे माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, प्रमुख पाहुणे म्हणून लातुर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर, माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, जेष्ठ नागरिक नागोराव पाटील रोशनगावकर, प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे, उद्योजक सुबोध काकाणी, विस्डम टेक्नो इंग्लिश स्कूलचे प्राचार्य हौसाजी जाधव, गोविंद पाटील रोशनगावकर,भरत पवार, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर, डी. आर. कंदकुर्तीकर, लक्ष्मण आगलावे, जी. पी. मिसाळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय, व्यापारी, पत्रकार, कृषी व शैक्षणिक मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक नागोराव पाटील रोशनगावकर यांना “तालुका भुषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. गणेशराव पाटील करखेलीकर व विनायकराव कुलकर्णी यांना “आदर्श राजकीय नेता” म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमतचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण तुरेराव यांना “आदर्श पत्रकार पुरस्कार” प्रदान करण्यात आला. सुबोध काकाणी यांना “आदर्श उद्योजक” पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. वसंतराव पाटील आल्लूरकर यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैबलवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तर डॉ. शेख एकबाल यांना आरोग्य रक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. व विविध परिक्षेत अधिक गुण घेऊन पात्र ठरलेल्या साठ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन गौरविण्यात आले.यावेळी लातुर बोर्डाचे वि.म.अध्यक्ष सुधाकरराव तेलंग व प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व आभार सतिश पाटील शिंदे यांनी केले तर सुचसंचालन प्रा.शेवलीकर, अशोक पाटील यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाईफ लाईन फिटनेस क्लब चे सतिश पाटील शिंदे व शेषेराव पाटील फडसे व टिम ने परिश्रम घेतले.
बहिष्कृत भारत पत्रकार, धर्माबाद जिल्हा नांदेड.