नाशिक,येवला: 08 जुलै : ‘राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे नाशिकमध्ये येवला येथे पोहोचले. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी शरद पवार म्हणाले की, माझा अंदाज कधी चुकत नाही पण इथं माझा अंदाज चुकला’ तुम्हाला त्रास झाला असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला काही जणांनी सांगितलं, पवारांनी नाव दिलं आम्ही निवडून दिलं, एकदा-दोनदा नाही तर तीन वेळा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, पण एका नावाने घोटाळा केला, त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा होता. मी इथे कोणावर टीका करण्यासाठी आलो नाही ना कुणाचं कौतुक करण्यासाठी इथं आलो मी यासाठी माफी मागण्यासाठी आलोय, माझा अंदाज कधी चुकत नाही, इथं माझा अंदाज चुकला’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पवारांनी जोरदार भाषण करून कार्यकर्त्यांची मनं जिंकली.