बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
हर्षवर्धन बोर्डेची उत्थुंग भरारी” Ph.D. साठी इंग्लड मध्ये झाली निवड. हर्षवर्धन बोर्डे या विद्यार्थ्याने साता समुद्रा पार आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे, त्यांची इंग्लड – या देशात Ph.D साठी निवड झाली आहे. त्याला त्या देशाकडून तब्बत 1 कोटी 70 लाख रुपये एवढी शिव्यवृत्ती मंजूर झाली आहे. हर्षवर्धन हा मूळचा शेळगांव अटोळ सारख्या ग्रामीण भागातील रहिवाशी असलेले सुखदेव बोर्डे यांचा मुलगा आहे. हर्षवर्धन याने IISER कोलकाता प.बंगाल येथून BS आणि MS. ही पदवी संपादन केली आहे. वडीलाची आर्थीक परिस्थिती बेताची आसतांना त्यांनी मुलांना उच्च शिक्षीत केले. त्यांच्या दोन (जुळे) मुलांनी फर्ग्यूसन कॉलेज येथून B.Sc पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी बी.डी.सी.सी. बँक मध्ये नोकरी करून अत्यंत तुटपुंज्या पगारात मुलांना उच्च शिक्षीत केले आहे.
हर्षवर्धन याने चिखली येथून मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. तो सुरवातीपासुनच हुशार होता. त्याला इतरापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. त्याची आई गृहीणी असून M.A.B.Ed आहे आणि त्यांनी आपल्या तीनही मुलांना चांगले संस्कार देऊन घडविले, मूलांच्या यशात त्यांचा सिहांचा वाटा आहे. त्यांना दोन वेळा नोकरीची संधी येऊनही त्यांनी ती मूलांच्या शिक्षणासाठी नाकारली. त्याचा फायदा त्यांना हर्षवर्धन सारखा हीरा घडविण्यासाठी झाला. या यशाचे श्रेय तो आई वडीलांना देतो. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.