जिल्हा परिषद सदस्य व पशुसंवर्धन दुग्ध विकास समिती च्या सभापती सुजाता पवार यांच्या प्रयत्नातुन व ग्रामपंचायत फ़ंडातून व्यवसायिक गाळ्याचे बांधकाम चालू आहे. गावातील रस्ता रुंदीकरण करण्यासाठी ज्या ज्या व्यावसायिक लोकांचे गाळे होते त्या लोकांना सदर गाळे मोफत बांधून देण्याच्या अटीवर सदर लोकांनी आपले चालू व्यवसाय असताना गेली सहा महिन्याचा कालावधी पासून त्यांनी ते बंद करून रस्ता रुंदी करणसाठी दिले. त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही गावातील पुढारी व ग्रामपंचायत यांनी दिली होती. त्यामुळे सदर गाळे धारकांनी गाळे पाडण्यास परवानगी देऊन व गाव विकासात मोलाचा वाटा उचला व त्याप्रमाणे गाळे पाडण्यात आले व लगेच नवीन गाळ्याचे काम सरकारी दवाखान्या शेजारी चालू झाले. सदर गाळ्याची पाहणी नवराष्ट्र चे पत्रकार हनुमंत पंडित, जनपप्रवास चे पत्रकार नंदकुमार पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खोमणे, जगदीश गायकवाड, श्रीकृष्ण भोसले, औदुंबर फटाले, उमाजी जाधव अतुल वाळके माहिती अधिकार कार्यकर्ते बालाजी कांबळे बहुजन मुक्ती पार्टी चे शिरूर तालुका अध्यक्ष राजू कांबळे व भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने पाहणी करण्यात आली. सदर काम सध्या पूर्णत्वास येत आहे.
गावातील ठरल्याप्रमाणे सदर गाळेधारकांना विना मोबदला गाळा देण्याचे काम लवकरच पूर्ण होईल अशी चर्चा गावांत चालू आहे व उर्वरित गाळे संदर्भात आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून ज्या लोकांची रोजी रोटी ज्या व्यवसायावर चालू होती व आपले घर ज्या व्यवसायावर चालू होते असे व्यवसाय बंद करून गावातील विकासासाठी मदत करून गाळे पाडण्यास सहकार्य केले. आज त्यातील काही जणांचे संसार उध्वस्त झाले आहेत, त्यातील काहीजण हे देशोधडीला लागले आहेत पण अजूनही ती लोक आपल्याला गाळे मिळतील अशा आशेवरतीे जगुन त्यातील काही लोकांचे मानसिक संतुलन ढासळत चाललेले आहे. याचा विचार सत्ताधारी व विरोधकांनी याचा विचार करून राहिलेले गाळे पूर्ण करावे अशी चर्चा गावात चालू आहे.