नांदेड येथील जिजाऊ ब्रिगेड यांकडून मणिपूर तसेच किरीट सोमय्या प्रकरण व नांदेडमधील गावगुंडांना कंटाळुन मुलीची आत्महत्या, अशा अनेक घटनांचा समावेश करून नांदेड येथील जिल्हा अधिकारी यांना जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती मढवई म्हणाल्या की,असे किती दिवस आपण निवेदन देणार आहोत. मणिपूरमध्ये जी घटना झाली ती अतिशय लज्जास्पद,घृणास्पद हा प्रकार समोर आलेला आहे. आणि जवळ जवळ 77 दिवस होऊनही सरकार किंवा प्रशासनाला जाग आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ समोर आला त्यांनी सगळ्या राज्यातील मंत्र्यांना आवाहन केले की,आपल्या आई भगिनी यांचे रक्षण करावे यासाठी कठोर कायदे करा असे सांगितले. परंतु तेथील भाजप चे मंत्री वीरेंद्र सिंह यांचा राजीनामा का घेण्यात आला नाही. त्या महिला कुणाच्या आई बहिणी नव्हत्या का? त्या भावाचा,बापाचा,आईचा खून झाला. दिवसा ढवळ्या त्या मुलीवर सामूहिक अत्याचार बलात्कार झाला त्या कुणाच्या आई बहिणी नव्हत्या का ? मग का तुम्ही मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह यांचा राजीनामा घेतला नाही. का गृहमंत्री अजूनही झोपेच सोंग घेवून आहेत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी अजूनही गप्प का आहे. म्हणजे मला अस वाटत अशी प्रकरण होण्यामागची कारणं असे आहे की,महिलांवर अत्याचार बलात्कार केला तरीही आरोपीची सहज सुटका होते.त्यांना मंत्रिपद मिळत आहेत. आणि एवढं सगळं मिळत असेल तर, एखाद्या मुलीची छेड काढली किंवा त्या मुलीवर अत्याचार केला तर काय फरक पडतो ही सगळी धारणा आजकाल लोकांची होत चालली आहे.त्यामुळेच महीलांवरती होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहेत. ठाकरे सरकारचे जे काय मंत्री म्हणजेच संजय राठोड यांचा त्यावेळी राजीनामा घेण्यात आला का तर, पूजा चव्हाण बलात्कार प्रकारामुळे . त्याच संजय राठोड ला भाजप सरकारमध्ये आल्यानंतर लगेच मंत्रिपद मिळते त्यानंतर कुलदीप सेंगर बलात्कार प्रकरण झालं भाजपचा व्यक्ती असल्यामुळे जवळजवळ सहा महिने गुन्हा दाखल करण्यासाठी लागले. तसेच उन्नाव प्रकरण झालं या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल एक वर्ष लागलं. भारताचे नाव भूषवणाऱ्या त्या महिला खेळाडू यांना दिल्लीतील जंतर मंतर येथे दोन महिने आंदोलन करावा लागल आज 140 कोटी भारतीय जनतेची जगात मान उंचावणाऱ्या गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या त्या महिला होत्या. कोणतीही महिला आपल्या इज्जतीवर कसा काय डाग लावेल त्या महिलांना दोन महिने आंदोलन करावे लागले इतकेच नव्हे तर त्यांना आपले गोल्ड मेडल देखील नदीत विसर्जन करण्याची वेळ आली देशातील दिग्गज खेळाडूंनी या महिलांना पाठिंबा दिला परंतु भाजपचा एकही मंत्री आमदार खासदार त्यावर ॲक्शन घ्यायला तयार नाही. नंतर देशातील विरो बघता तात्पुरता ब्रुजभूषण सिंह यांना अटक झाली परंतु (POSCO) पोस्को कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंबहुना त्या कायद्याचे कलम लावण्यात आले नाही कारण ही सगळी कलम नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत म्हणून त्याची जामीनावर सुटका देखील झाली. म्हणून हे काय चाललं आहे आपल्या मंत्र्यांसाठी कायदा सुव्यवस्था आपण धाब्यावर बसवत आहे. त्यानंतर म्हणजेच किरीट सोमय्या प्रकरण महिले सोबत अश्लील व्हिडिओ अख्या देशाने पाहिले परंतु त्याच्यावर साधी पक्षातून काढण्याची कारवाई सुद्धा करण्यात आली नाही मग काय अपेक्षा ठेवायची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्याच्या महिलांच्या रक्षणाची खरंतर यावर प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे त्या महिला मनिपुर मधल्या नव्हत्या तर त्या “महिला” होत्या हे सगळं महिलांनी सुद्धा लक्षात ठेवा आणि आपल्याला जो मरिजीच्या वेशातला रावण आलेला आहे त्याचा खात्मा करावा लागेल अन्यथा मणिपूर सारखेच आपल्याबरोबरही कधी होऊ शकते, कारण जोपर्यंत माझ्या अंगावर शिंतोडा उडत नाही तोपर्यंत गप्प बसण ही वृत्ती आपण सोडा बाई पण भारीच आहे पण ते बाई पण जपण्यासाठी कधीतरी तुम्हालाच लढावं लागेल असं आव्हान मी माझ्या मैत्रिणींना करते आणि इथल्या नेत्यांना आणि जनतेलाही आव्हान करते की, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि अन्यायाला वाचा फोडा कारण अन्याय करणारा गुन्हेगार असतोच पण अन्याय सहन करणारा देखील गुन्हेगार असतो हे लक्षात ठेवा असे डॉ.भारती मढवई यांनी आवाहन केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड नांदेडच्या डॉक्टर विद्या पाटील जिल्हा अध्यक्ष अरुणा जाधव जिल्हा सचिव मीनाक्षी पाटील मुखेड तालुका अध्यक्ष कविता आगलावे आणि जिल्हा संघटन कल्पनाताई चव्हाण आणि काही सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.
(सहसंपादक _ रोहन मोकळ)