जि.प.प्राथमिक शाळा चकोरवस्ती मांडवगण फराटा येथील शाळेस भागवत भिवाजी गायकवाड (निवृत्त पाटबंधारे कर्मचारी) पाटस यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतुने तसेच आपण ज्या गावात परिसरात लहानाचे मोठे झालो त्या भागाचे उतराई होण्याच्या हेतूने शाळेला संगणक संच व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच मूलांना खाऊ वाटप केला.ज्या शाळेने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली त्या शाळेमुळे आज मी व माझे कुटुंब ताठ मानेने जगत आहोत.आर्थिक परस्थिती नसताना आम्हाला त्या वेळच्या शिक्षकांनी समजवून उमजवून आम्हाला सहकार्य केल त्यामुळे माझे आयुष्य उज्वल झाल त्या ऋणातून मुक्त होता येणार नाही परंतु त्याचे काही अंशी का होईना शाळेला मदत करून त्या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला असे उद्दगार भागवत भिवाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण विजय चकोर मुख्याध्यापक श्री.संतोष जगताप, शिक्षक श्री.प्रशांत भापकर, ज्येष्ठ नागरिक सूभाष चकोर ,तात्यासाहेब धेंडे, शहाजी गायकवाड,सोमनाथ फराटे, विकास फराटे ,जगदीश गायकवाड ,बालवाडी सेविका वैशाली कांबळे ,अभिजीत फराटे, धनंजय कुंभार,बाळासाहेब चकोर,सूधीर चकोर ,अर्चना फराटे अधिरा गायकवाड इ.ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.संतोष जगताप यांनी केले.आभार उपशिक्षक प्रशांत भापकर यांनी केले.