गावठाण हद्दीतील लहान मुलांना खेळण्यासाठी बाल क्रिडांगणाची अत्यंत आवश्यकता असतानाही नगरपरिषद कडून विकास आराखडय़ातील आरक्षण क्र १७ (CPG) ह्या गावठाण हद्दीतील ३५ गुंठे भुखंडावर वनीकरण करून परिसरातील नागरिकांवर आणि विषेशतः लहान मुलांवर अन्याय करत आहेत.
आजमितीला शिरूर शहरातील मुख्य गावठाण हद्दीतील लहान मुलांना खेळण्यासाठी बाल क्रिडांगणाची अत्यंत आवश्यकता आहे, अनेक वेळा काची आळी, कामाठीपुरा, कैकाडी आळी, ढोर आळी आणि कुंभार आळी येथील लहान मुलांना क्रिडांगण अभावी वहातूकीच्या रस्त्यावर खेळावे लागते त्यामुळे अनेक वेळा अपघात ही होतात आणि त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना खेळायला मैदान नसल्याने खेळूच देत नाहीत. शहरातील मुलांचा शारीरिक व मानसिक विकास घडविण्यासाठी मुलांना मनसोक्तपणे खेळण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे असतानाही शिरूर नगरपरिषद कडून विकास आराखडय़ातील आरक्षण क्र १७ (CPG) CHILDREN PLAYING GROUND / बाल क्रिडांगण ह्या गावठाण हद्दीतील ३५ गुंठे भुखंडावर वनीकरण करून परिसरातील नागरिकांवर आणि विषेशतः लहान मुलांवर मोठा अन्याय करत आहात ही दुर्दैवी बाब आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनीकरण करायचेच असेल तर नदीकाठावर अनेक भुखंडावर ग्रीन झोन चे आरक्षण आहे त्या ठिकाणी वनीकरण करावे, मुख्य गावठाण हद्दीत दाठ लोकवस्ती मध्ये मोकळी जागा असणे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी बाल क्रिडांगण असणे भविष्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाप्रकारच्या अशायच्या निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरूर नगर परिषद यांना विनंती करण्यात आली की सदरील भुखंडावर वनीकरण करण्याच्या निर्णयाचा आपण फेरविचार करावा अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे निवेदन देन्यात आले. यावेळी
फिरोज अब्दुलरहमान सय्यद बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष ,नाथाभाऊ पाचर्णे भारतीय बहुजन पालक संघ राज्य संयोजक,राजू कांबळे बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष,समाधान लोंढे बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर अध्यक्ष,फैझल पठाण काँग्रेस शिरूर तालुका सरचिटणीस,अशोक गुळादे बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर संघटक,किसन भोसले सामाजिक कार्यकर्ते शिरूर असे उपस्थीत होते.