बेडग प्रकरणी FIR च्या अनुषंगाने काही महत्वाची निरीक्षणे-अॅड.दादाराव नांगरे
बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारी स्वागत कमान पाडल्यामुळे बेडग गावातील समस्त आंबेडकरी समाजाने गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान चालत नाही त्या गावात आम्हाला राहायचं नाही असा निर्णय बेडग मधील सबंध आंबेडकरी समाजाने घेतला होता
बेडग-स्वागत कमानीच्या पायाभरणी नंतर मुख्य काम सुरू असताना जातीय द्वेषभवणेतून सरपंचांनी हिणकस वृत्तीने कमानीच्या कामाला बेकायदेशीर ठरवून पाडले.
“आम्ही महार समाजाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामानीखालून जायचे का??”
-सरपंच उमेश पाटील -बेडग, सांगली यांच्या विरोधात
IPC 295 अट्रोसिटी ऍक्ट 3(1)r,s,t नुसार गुन्हा नोंद.
बेडग-येथील फिर्यादी डॉ माहेशकुमार कंबळे उच्चशिक्षित आहे परंतु अजूनही हिंदू महारच आहे .
फिर्याद देताना अट्रोसिटी विषयातील कायदेतज्ज्ञ चा सल्ला घ्यायला हवा होता.जवाब कमकुवत असल्याने जामीन होईल .
परंतु यापुढे योग्य कायदेशीर सल्ल्यानुसार कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर जवाब देताना परिपूर्ण आणि आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाणारा हवा .
त्यासाठी समाजातील अनेक तज्ञमंडळी आहेत त्यांची मदत घ्यावी .
बेडग ते मंत्रालय मार्च काढून आपण विरोध केला आणि स्वाभिमानाने गाव सोडले हे अभिमानास्पद आहे परंतु एवढ्याने आरोपींना सजा नाही होणार त्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे .न टिकणारी FIR मुळे आरोपीं सहज जामिनावर सुटतात आणि त्यांचा विश्वास अजूनच दृढ होतो की बिनधास्त अन्याय करा काही होत नाही .
हे होऊ दयायचे नसेल तर कायदेशीर बाबी हाताळताना अनुभवी आणि योग्य (मॅनेज ना होणाऱ्या) व्यक्तीच्या सल्ल्याने आणि अट्रोसिटी ऍक्ट मध्ये सातत्याने काम करणाऱ्या तज्ञ वकिलाची मदत घ्या .
आपण लढाई नक्कीच जिंकून बेडग च्या आंबेडकरी समाजाला न्याय देऊ .
समाजावर अन्याय झाल्यास मला कधीही हाक द्या
समाजाच्या न्यायासाठी मी सदैव उभा असेल .
तुमचाच
अॅड.दादाराव नांगरे
+91 7977043372
ई-मेल advdadaraonangare@gmail.com
Law Sarathi-लॉ सारथी
National Students Union – NSU
All India Federation Of Advocate and Association-AIFAA