उदयनगर पासून नजीकच असलेल्या डासाळा येथे गावाजवळच असलेल्या सुभाष रामभाऊ पैठणे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १३ ऑगस्ट दुपारी बारा वाजे दरम्यान घडली सदर महिला हे सुलोचना विष्णू करवते वय 35 वर्षे राहणार कारकामटा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील रहिवासी असून तिची तब्येत ठीक नसल्यामुळे ते तिच्या माहेरी वडाळी तालुका मेहकर येथे चार-पाच दिवसापासून आलेले असताना तिला 13 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान डॉक्टर देवकर यांच्या दवाखान्यात आणले होते परंतु पती व मुलगा नाश्ता करण्यासाठी एक हॉटेलमध्ये बसले असता सदर महिला तेथून पसार झाल्याचे कळले तेव्हा ही गोष्ट पतीच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केले परंतु ती कोठेही सापडले नाही काहीच वेळात सुभाष पैठणे यांचे भाऊ दिनकर पैठणे विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता तेव्हा विहिरीत कुणाचातरी मृतदेह तरंगत असताना त्यांच्या निदर्शनात आला तेव्हा त्यांनी गावातील लोकांना फोन करून बोलावले आणि त्याचप्रमाणे अमडापूर पोलीस स्टेशनला सुद्धा सूचना देण्यात आले बिट जमादार ठाकूर व त्यांचे सहकारी भुतेकर हे घटनास्थळी पोहोचून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळेस मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला ज्यावेळेस पाहिलं तर हे महिला कुणाच्याच ओळखीचे नसल्याचे निदर्शनात आले आणि त्याच वेळेस सामाजिक माध्यम व्हाट्सअप ग्रुप अंतर्गत ते हजर असलेल्या नागरिकांनी आपापल्या ग्रुप वर हे माहिती पसरवले काही वेळाने ही बातमी वाऱ्यासारखे पसरली आणि ज्या वेळेस ही माहिती मृतकाचा भाऊ मारुती आणि पतीला कळले त्याच वेळेस त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व मृतक महिलेची ओळख पटली सदर महिलेचा मृतदेह चिखली येथे उत्तरिय तपासण्यासाठी पाठवण्यात आला आहे.सदर मृत्त महिलेच्या पश्चात पती दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे आणि या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे