हाडामासाच्या कार्यकर्त्याला मिळाला न्याय
अमडापुर प्रतिनिधी:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या सोशल मीडिया विभागीय समन्वयक पदी श्री.ज्ञानेश्वर पचांगे यांची नियुक्ती झाल्या बद्दल अमडापूर परिसरासह ग्रामीण भागातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून अमडापुर परिसरात इसोली गावाचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून उदयाला आलेल्या ज्ञानेश्वर पचांगे नावाच्या रोट्याचं आज वटवृक्षांमध्ये रूपांतर होताना दिसत आहे, गोरगरिबाचे काम असोत, लोकांच्या सुखदुःखात न बोलता, कोणत्याही प्रकारच्या पक्षपात न करता जातीपात न करता धावून जाणारा तरुण म्हणून एक हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून ज्ञानेश्वर पचांगे यांची परिसरात ओळख आहे
राजकारण समाजकारणामध्ये कुठलाही राजकीय वारसा नसताना, आपल्या कर्तुत्वाचा जोरावर जिल्हा युवक काँग्रेसच्या सचिव पदावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2024 मध्ये होणारे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, काँग्रेस पक्षाचे आचार,विचार,ध्येय,धोरण, उद्दिष्ट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व कॉग्रेस पक्षाचे संघटन बळकट व मजबूत करण्याच्या उद्देशाने, व त्यांनी जिल्हा युवक काँग्रेस च्या सचिव पदावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. माजी आमदार श्री. राहुल भाऊ बोंद्रे व तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री समाधान भाऊ सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेत,ऑल इंडिया युवक काँग्रेस सोशल मीडिया विभागाने काल महाराष्ट्रत विभागीय नियुक्त्या जाहीर केल्या,त्यामध्ये बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेस चे सचिव श्री. ज्ञानेश्वर पचांगे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या समन्वयक पदी आज नियुक्ती जाहीर झाली
त्याबद्दल ज्ञानेश्वर पचांगे याच्या बद्दल परिसरात तरुणांन मध्ये आनंद निर्माण झाला असून परिसरात अभिनंदनाचा वर्षाव त्यावर सुरू आहे.