हे कार्यालय आपले कार्यालय असून मी व माझे अधिनस्त अधिकारी कर्मचारी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर.
अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन,
राज्य, जनतेतील दुर्बल घटक, आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील.या भारतीय राज्यघटनेच्या
अनुच्छेद 46 या कलमाचे तंतोतंत पालन करणारे लोकांना प्रिय असणारे अधिकारी अर्थातच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे
“हे कार्यालय आपले असून,मी व माझे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत.माझ्या दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी आपणास कोणत्याही पूर्वपरवानगीची अथवा चिट्टी देण्याची गरज नाही “असा बोर्ड कार्यालयाच्या दारावर लावणारे तसेच छातीठोकपणे संविधानिक मार्गावर चालणारे प्रामाणिक अन कर्तव्यदक्ष अधिकारी विशाल लोंढे यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे हा प्रयोग केला . पुणे येथे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पुणे येथे बदली झाली तेंव्हा पदभार घेतल्या बरोबर त्यांनी ही पाटी लावली .
विशाल लोंढे हे सामाजिक भान जपणारे अधिकारी तसेच सामाजिक न्याय विभागाला आपल्या कामातून न्याय देणारे अतिशय लोकाभिमुख व्यक्तिमत्व आहेत .
त्यांची बदली पुण्याला झाल्यामुळं पुण्यातील जनतेला आनंद झाला आहे .