व्हॉलीबॉल स्पर्धेत ग्रीनफिल्ड स्कुल व विद्यामंदिर चे संघ विजयी
धर्माबाद (बहिष्कृत भारत वार्ताहर) धर्माबाद येथे महाराष्ट्र शासन व पुणे युवक क्रीडा संचननालय यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या ह्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत काल व्हॉलीबॉल खेळाची स्पर्धा पार पडली. ह्या स्पर्धेचे उदघाटन क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून झाली. ज्यामध्ये 14 वर्षाखालील वयोगटातील ग्रीनफिल्ड स्कुल च्या मुलांच्या संघाने आपल्या प्रतिस्पर्धीला हरवून प्रथम क्रमांक पटकावले. याच गटात येथील स्व.राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर चा मुलींचा संघ विजयी झाला आहे तर 17 वर्षाखालील वयोगटात स्व.राजाराम काकाणी सहकार विद्यामंदिर शाळेच्या मुलांनी व मुलींनी विजय मिळवले आहे. ह्यामुळे वरील सर्व संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक अहमद लड्डा सोबतच श्रीनिवास दर्शन, जेष्ठ खेळाडू व पंच देविदास पारेकर, श्रीनिवास कांबळे,पंच बिर्जे, गुण लेखक निशांत भोसले, पंच रघु सूर्यवंशी, गणेश जठालकर आणि शिवाजी गोस्कुलवाड यांनी परिश्रम घेतले. ग्रीनफिल्ड स्कुल चे संचालक शिवराज पा.होटालकर, मुख्याध्यापक शेख खदीर,अजय घाटे, संतोष इनामदार आणि दिगाबंर हिंगणे तर स्व.राजाराम काकाणी विद्यामंदिर चे संचालक सुबोध सेठ काकाणी व मुख्याध्यापक सौरव सक्सेना सहित सर्व कर्मचाऱ्यांनी आप-आपल्या शाळेंच्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.