धर्माबाद न.पा.चे नवे मुख्याधिकारी सतीश पुदाके यांनी स्वीकारला पदभार
धर्माबाद (बहिष्कृत भारत वार्ताहर) नगरपरिषदेचे तात्कालीन मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंत अनेक प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचा कारभार चालविला आहे . परंतु दिर्घ प्रतिक्षेनंतर शासनानी धर्माबाद नगरपरिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून सतिष पुदाके यांची नेमणूक केली आहे.
नवनिर्वाचित मुख्याधिकारी सतिष पुदाके यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे.
येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी सोमवारी मुख्याधिकारी सतिष पुदाके यांची भेट घेऊन भाजपाच्या वतीने त्यांचा स्वागत करण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष रामेश्वर गंदलवार, माजी नगरसेवक संजय पवार, चैतन्य घाटे,अमित मुंदडा, कृष्णा तिम्मापुरे, कार्यालयीन अधीक्षक तुंगीनवार, दत्तू गुर्जलवाड उपस्थित होते. सदरील भेटीत अनेक प्रलंबित मागण्या व विकास कामे तसे शहरातील जनतेला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सखोल चर्चा करण्यात आली आहे.