भारतीय सैन्य दलातून निष्ठा पूर्वक
भारत मातेची सेवा करून सन्मानाने सेवानिवृत्त झालेले सैनिक श्री विजय बापू जगताप यांचा जाहीर नागरी सन्मान व सत्कार गावच्या वतीने करण्यात आला.भारतीय सैन्य दलामध्ये हवालदार क्लर्क या पदावर आपली सेवा करत होते.अतिशय खडतर परिस्थितीमध्ये इच्छाशक्तीच्या जोरावर लहानपणापासूनच भारतीय सैन्यात जायचं स्वप्न उराशी बाळगून भारतीय सैन्यामध्ये भरती झाले. वेलिंग्टन या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झाले. ते 26 मद्रास युनिट मध्ये काम करत होते. त्यांनी आपली एकूण सेवा 17 वर्ष दोन महिने केली , या कालावधीमध्ये त्यांनी हैदराबाद, अरुणाचल प्रदेश, डेहराडून, राज्यस्थान ,लेक लडाख ,जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी निष्ठा पूर्वक आणि सन्मानपूर्वक आपली सेवा बजावली .त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सेवा करताना घडलेल्या अनेक प्रसंगाचं आणि थरारची माहिती सामान्य जनतेला दिली .यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हनुमंत फराटे ,उपसरपंच अशोक जगताप ,माजी सरपंच शिवाजी कदम ,माजी उपसरपंच
सुभाष फराटे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश परदेशी मेजर ,रुद्र कंट्रक्शन चे राहुल फराटे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मांडवगण फराटा येथील माजी सैनिक संघटनेचे पांडुरंग चौधरी , विठ्ठलराव पवार ,शामराव वराळे ,संजय ढमढरे ,भाऊसाहेब जाधव ,दत्तात्रेय ढमढेरे, बाळासाहेब थोरात ,लक्ष्मण जाधव तसेच उपसरपंच अशोक जगताप ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मोरे, अमोल शितोळे ,भाऊसाहेब कोळपे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण भोसले, नंदकुमार पवार, हनुमंत पंडित,बालाजी महाराज कांबळे,
गणेश फराटे, अक्षय फराटे,सुनील चव्हाण व मांडवण फराटा येथील समस्त ग्रामस्थ व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी प्रस्तावना व सूत्रसंचालन बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर तालुका अध्यक्ष राजाभाऊ कांबळे आणि उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण भोसले यांनी केले आणि राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम समाप्त झाला.