मांडवगण फराटा :प्रतिनिधी
सोमवार दि.११/९/२०२३ द्वादशी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मांडवगण फराटा श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात साजरी करण्यात आली. सकाळी प्रतीमा पूजन, सकाळी १०:३० ते १२ ह.भ.प. गणेश महाराज जगताप (आळंदी वारकरी संप्रदाय ) यांचे प्रवचन झाले. महाराजांनी संत सेना महाराज यांच्या संपूर्ण अध्यात्मिक जीवनावर आपल्या प्रवचनातून पांडुरंग व सेना महाराज यांच्या भक्ती बद्दल सांगितले. संत सेना महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज, संत रोहिदास महाराज,संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत होते.जन्म राजस्थानात झाला परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर वारकरी संप्रदायाचे ते एक भाग बनले.त्यांचे अनेक अभंग ,चरित्र याबाबत अनेक संतांच्या अभंगातून दिसून येते.
प्रवचन सेवेनंतर सर्वांना फराळाचा महाप्रसाद देण्यात आला.
मांडवगण फराटा येथील नाभिक संघटना कार्यकर्ते हनुमंत पंडित, दादासाहेब साळुंके, बबनराव साळुंके, अशोक साळुंके, दिपक अत्रे,सुनील साळुंके,हरिश्चंद्र मोरे, भास्कर पवळे, अर्जुन रंधवे, रविंद्र राऊत,संतोष साळुंके, अभिजित साळुंके, दत्तात्रय साळुंके,राहुल साळुंके,सोमनाथ राऊत,सूर्यकांत साळुंके,दीपक मोरे,ओंकार साळुंके, मधुकर राऊत,आशुतोष साळुंके
तसेच श्री माऊली मंदिर ट्रस्ट चे प्रमुख माणिक आण्णा फराटे, दादासाहेब फराटे,लक्ष्मणबाप्पू फराटे,श्री वाघेश्वर विध्याधाम प्रशालेचे प्राचार्य रामदास चव्हाण सर,नंदकुमार पवार, बालाजी महाराज कांबळे,राजू कांबळे,श्रीकृष्ण भोसले, संतोष परदेशी सर,हरिमामा फराटे,जगदीश गायकवाड, औदुंबर फटाले, शामराव यशवंते,अमोल जगताप,रामदास जगताप,दादासाहेब सोनवणे,मोहन शेलार,मोहन बाबा फराटे, शामराव जगताप,माऊली काका जगताप,प्रवीण कुंभार, बालाजी गोरे असंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.