बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर पासुन जवळच असलेल्या डासाळा शिवारामध्ये सध्या हिंस्र प्राण्यांनी धुडगूस माजवला आहे गेल्या दोन महिन्यापासून डासाळा शिवारामध्ये आपल्या दोन पिला सह एक मादी बिबट् वावरत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्या घ्या एका पिलाला रोड क्रॉस करतं असताना अज्ञात वाहनाने उडवले व त्यामध्ये त्याचा मृत्यू झालातेव्हापासून मादी बिबट हे पिसाळल्या सारखे करत आहे रोजी त्या परिसरात निदर्शनास येते आहे.त्यामुळे शेतकर्यांचा मणात दहशत निर्माण झाली आहे.आणी काही शेतकऱ्यांनी तर शेतात जाने चे सोडले आहे.परंतु आता आठ ते दहा दिवसांनी शेतकर्यांचा सोयाबीन काढणीला येणार आहे हे जर असंच चालू राहिलं तर ते काढायचं कसं असा प्रश्न शेतकर्याला भेडसावत आहे. याबद्दलवेळोवेळी वनविभागाच्या कळवले असताना सुद्धा वनविभागाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी राजा हैराण झाला आहे.याच बिबट्याने मागील अंदाजे दोन महिन्यापूर्वी डासाळा येथील एका युवकांवर हल्ला चढविला होता त्यामुळे शेतकर्यांचा मणात दहशत निर्माण झाली आहे.वनविभाग या हिंस्र प्राण्यांला जेरबंद करतील का? शेतकरी आता शेतात कधी जाऊ शकेल? वनविभाग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.