मांडवगण फराटा: प्रतिनिधी
मांडवगण फराटा ता. शिरूर ग्रामपंचायत यांनी गावातील मुख्य रस्ता रुंदीकरण करुन पक्का सिमेंट रस्ता तयार केलेले दोन वर्षे होऊन गेली आहेत. रस्ता करताना रस्त्याच्या कडेने ग्रामपंचायत मांडवगण फराटा यांना नियमित जागा भाडे व नियमितपणे करारनामा करणारे व्यवसायिक यांच्या टपऱ्या, काहींची पक्की बांधकाम केलेले व्यावसायिक गाळे होते.रस्त्याचे काम करण्यासाठी त्यावेळी सत्तेत असणारे व विरोधात असणारे सर्वच राजकीय नेते यांनी टपरी धारक व गाळे धारक यांना विश्वासात घेऊन व दुसरीकडे चांगले पक्के बांधकाम केलेलं व्यावसायिक गाळे देऊ तुम्ही आपापली दुकाने काढून घ्या असे सांगितले.
गावातील या नेत्यांचा शब्दांवर विश्वास ठेवून काहींनी आपली दुकाने काढून घेतली तर काहींच्यावर ग्रामपंचायतने गरज नसताना अतिक्रमण कारवाई केली.गेली दोन वर्षे लोटली तरीही दुकानदार ,गाळे धारक यांना नवीन जागा किंवा गाळे उपलब्ध करुन दिली नाही.
सर्वच व्यावसायिक हे हातावर पोट असणारे गरीब कुटुंबातील असून आज गावात मिळेल त्या ठिकाणी व घेतील तेव्हढे भाडे देऊन व्यवसाय करीत आहेत. रस्त्यावर असणारे व्यवसायात आडबाजूला गेल्यामुळे व्यवसाय चालेनात परिणामी व्यावसायिक कर्जबाजारी झालेत बँकेची कर्जे थकली आहेत .व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
असेच एक नाभिक समाजाचे व्यासायिक रामदास तुकाराम जाधव हे रस्त्यावर असणारे कटिंग सलुनचे दुकान ग्रामपंचायतचे एकूण आहे त्या जागेवरून उचलले .परंतु पुन्हा दुकान सुरू करण्यासाठी गावात परवडेल अशी जागा भेटेना.एका व्यक्तीने त्यांना जागा देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले व जागा दिली नाही व पैसेही दिले नाही. परिणामी रामदास तुकाराम जाधव हे खचून आजारी पडले व त्यातून सावरलेच नाही.नुकतेच त्यांचे निधन झाले. गावातील पुढारी व ग्रामपंचायत यांच्या गचाळ राजकारणाचा रामदास जाधव बळी ठरले अशी चर्चा सुरू आहे. गेली दोन वर्षे दुकान बंद असल्याने व मुलगा सतत आजारी असल्याने गावातील व समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना सढळ हाताने मदत केली .अंत्यविधी ते तेरावा पर्यत सर्व खर्च करून उरलेली रक्कम त्यांच्या पत्नी यांच्या खात्यावर जमा केली.वरदविनायक मित्र मंडळ यांनी एक महिना पुरेल एवढे किराणा साहित्य दिले.आमदार अशोक पवार यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. दशक्रिया विधीचे १०० लोकांचे अन्नदान घोडगंगा स.सा. कारखाना संचालक संभाजी शिवाजीराव फराटे यांनी दिले.स्पीकर ,माईक,चटया संदीप नामदेव वाव्हळ यांनी मोफत व्यवस्था केली. १०० Strict लोकांनी आर्थिक साहाय्य केले सर्व दानशूर व्यक्तिंमुळे जाधव कुटुंबाला आधार मिळाला. रामदास जाधव यांचे कुटुंब अडचणीत आहे व त्यांना मदतीची गरज आहे हे नाभिक समाजाचे कार्यकर्ते हनुमंत पंडित मा.पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बाप्पू फराटे ,हरिमामा फराटे, सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे,श्रीकृष्ण भोसले या सर्वांनी लोकांना मदतीचे आवाहन केले व लोकांनी चांगला प्रतिसाद देत जाधव कुटुंबाला वेळीच मदत झाली.
अशी वेळ अजून एखाद्या दुसऱ्या व्यावसायिकांवर येऊ नये म्हणून राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करावेत जे गाळे पूर्ण झालेत ते बिगर डिपॉजिट प्राधान्य क्रमाने खरच गरजू आहेत त्यांना मिळावेत अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे.
नवीन व्यावसायिक गाळे बांधकाम सुरू केले होते त्यावेळी आमदार अशोक पवार यांची ग्रामपंचायत मध्ये सत्ता होती.आज दादा पाटील फराटे यांची सत्ता आहे.त्यामुळेच जुनी कामे रखडतात काय अशी चर्चा आहे.