दि 09आक्टोबर धर्माबाद तालुका प्रतिनिधी
धर्माबाद:- (गजानन वाघमारे) शहरातून त्रिवेणी संगम संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महामार्गावरून जाणाऱ्या सिरजखोड येथील फाट्याजवळ भारताचे मिसाईलमान व पूर्व राष्ट्रपती तथा वैज्ञानिक डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नाम फलकाचे अनावरण समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले.
एका सामान्य गरीब कुटूंबातून आपल्या स्वबळावर पेपर विकत स्वतःच्या करतत्वाने जगाच्या पाठीवर भारताचे नाव गाजविले अशा या महान क्रांतिकारी महापुरुष डाँ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे महान विचार समाजात रुजावे या उद्देशातून किंवा भावनेतून या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी दत्ता पाटील पवार,ग्रा.पंचायत सदस्य दत्ताहरी सज्जन, गोविंद सज्जन, नामदेव सज्जन ,पांडुरंग सज्जन,विशाल सज्जन,सय्यद इम्रान, मिर्झा अजीस, मिर्झा गुनू,मिर्झा रउफ बेग ,इब्राहीम बेग, हारुण बेग,मिर्झा नाहेद बेग,इम्रान पठाण,आदी गावातील कार्यकक्षेतील इत्यादी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.