मांडवगण फराटा ता. शिरूर येथील मारुती भैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने बचत गटातून शिल्लक राहिलेल्या पैशातून मारुती मंदिर, जोगेश्वरी माता व भैरवनाथ मंदिरास चांदीचे दागिने भेट म्हणून देण्यात आले. मारुती भैरवनाथ सेवा मंडळाची स्थापना कै. श्यामराव अप्पा चकोर, संभाजी नाना फराटे, आदर्श पोलीस पाटील बाबासो पाटील फराटे, नवनाथ दादा शितोळे यांनी सण २००८ साली सामाजिक उपक्रम राबवण्याचा उद्दिष्टाने मंडळाची व बचत गटाची स्थापना केली होती. या मंडळाच्या स्थापनेनंतर भैरवनाथ मंदिर व मारुती मंदिराचा जीर्णोद्धार, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, वृक्षारोपण , रंगकाम इत्यादी कामे या मंडळाच्या वतीने करण्यात आली. दरवर्षी मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सव, कोजागिरी पोर्णिमा, कालाष्टमी, दसरा, पाडवा, होळी, नवरात्र उत्सव इत्यादी कार्यक्रम साजरे केले जातात. दरवर्षी मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात दररोज जवळपास चारशे ते पाचशे लोकांना फराळाचे वाटप केले जाते. जय भवानी पायी दिंडीतील वारकऱ्यांना देखील मंडळाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य ज्योत पेडगाव वरून आल्यावर त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम मंडळाच्या वतीने केला जातो. शिवाजी महाराज जयंती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकत्रित जयंती देखील मंडळाच्या वतीने साजरी केली जाते. मंडळाचे सार्वजनिक वाचनालय असून त्यामध्ये अनेक प्रकारची पुस्तके असून एम.पी.एस.सी ची देखील पुस्तके आहेत. मारुती भैरवनाथ सेवा मंडळात अनेक जाती धर्मातील लोकं असून सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्रित येऊन वर्षभरातील सर्व सण उत्सव साजरे करतात. मारुती भैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने गरीब कुटुंबातील व्यक्तींचे मोफत विवाह देखील केले जातात ज्यामध्ये हॉल, वाजंत्री, जेवनसाठीचे भांडे, माईक सिस्टीम, चटया इत्यादी मोफत दिले जाते. मंडळाचे सार्वजनिक वाचनालय असून यामध्ये अनेक विद्यार्थी वाचनाबरोबर स्पर्धा परीक्षा, शालेय परीक्षा इत्यादींचा अभ्यास वाचनालयात केला जातो, विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा फायदा घेऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे अशी आमच्या मंडळाची इच्छा असून भविष्यात देखील विविध उपक्रम मंडळाच्या राबवले जाणार आहेत असे बाबासो पाटील फराटे, आदर्श पोलीस पाटील,विश्वस्त मारुती भैरवनाथ सेवा मंडळ यांनी सांगितले.या मंडळाच्या सर्व कार्यक्रमात माजी प्राचार्य अशोक वेदपाठक, राजेंद्र कांबळे सर, संतोष बोरा, हेमंत उपाध्ये, सागर वेदपाठक, किसन भोसले, प्रसाद कटारिया, किरण गायकवाड, गणेश चव्हाण, गणेश हेंद्र,राजू माने, दत्ता सोनवणे, ईश्वर गायकवाड, बाबू राठोड, अर्जुन राठोड,नाना बहिरे, किरण राठोड, शिवाजी कोळपे,सोमनाथ कड, बाबासाहेब उदमले, आदी कार्यकर्ते मंडळाच्या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात.