बहुचर्चित असलेल्या बाभळी बंधारा चा वाद सर्वोच्च न्यायालयात चालू असताना पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बंधा-याचा सुरक्षितता वा-यावर तर आहेच या दहा वर्षातच बंधाराचे गेट गंजत असुन बंधा-याला भेगा पडलेले सुध्दा आहे.शेतकरी हितासाठी, कोठ्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाराची अवकळा निर्माण झाली आहे.या ठिकाणी लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.बंधाराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून रस्त्याच्या दोन्हीही कडेला काठेरी झुडपे वाढत असल्याने ये जा करण-या वाहक व नागरिकांना गैरसोय होत आहे.धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधारा गोदावरी नदी काठावर कोठ्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आला.या बंधारा मुळे आम्हच्या राज्याचे वाळवंट होईल असा कांगावा आंध्रप्रदेश/तेलंगणातील राजकीय नेत्यांनी केला.तेव्हा बाभळी बंधाराचा वाद महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यानी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेऊन. ठेवले .प्रदिर्घ लढानंतर सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.तेव्हापासुन गेट त्रिस्तरीय समितीच्या उपस्थीतीत उघडणे व बंद करणे एक कलमी कार्यक्रम चालुच आहे.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी बाभळी बंधारा चे अधिकारी दुर्लक्ष करतात.गेटाचे नट बोल्ट गंजुन गेलेले आहेत.बंधांराला भेगा सुध्दा पडलेले आहेत.एवढेच नसुन लाईट नसल्याने बंधारा अंधारात आहे.बंधारा दुरुस्तीसाठी दर वर्षी लाखोचा निधी येतो ते कुठे खर्च करतात संशयास्पद आहे. बंधा-याची सुरक्षितता वा-यावर… महाराष्ट्र व तेलगणा राज्यात बाभळी बंधारा निर्मितीपासुन वाद असताना बंधा-याच्या सुरक्षिततेबद्दल महाराष्ट्र शासन उदासीन आहे.सेक्युरटी गार्डाची नियुक्ती नाही.त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन कधीही तेलंगणातील मिडीया राजकीय पुढारी येऊन फायदा घेतात एवढेच नसुन या बंधाऱ्यावरून एक तरुण नदी पात्रात उडी मारुन आत्महत्या केली. असे उदाहरण आहे.याव्यतरीक इतर सोयीसुविधा नाहीत.** बंधारा व परिसरात विद्युत ची सोय नाही बंधारा व परिसरात विद्युतची सोय नसल्यामुळे जवऴपास 70 ते 80 विद्युत दिवे बंद अवस्थेत आहेत. विद्युत पोल शोभेची वस्तू बनली आहे.त्यामुळे बंधारा परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाकडुन दरवाजे बंद करणे व उघडण्याच्या तारखेच्या वेळी विद्युत ची सोय केली जाते.याठिकाणी ** बंधा-याकडे जाणा-या रस्त्याची दुर्देशा बाभळी बंधा-याकडे जाण्यासाठी बाभळी गावापासुन ते बाभळी बंधारा पर्यंत रस्ता बनविण्यात आला. त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असुन रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे- झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे ये-जा करणा-यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी अकरा लाख रुपयेची मंजुरी मिळाली पण पाच वर्षे उलटला अद्याप कामे करण्यात आले नाही. पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.