धर्माबाद(वार्ताहर )तालुक्यातील गोदावरी नदी वरील बांधण्यात आलेल्या बाबळी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बंधाऱ्यापर्यंत त्याचे मजबुतीकरण व हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समितीने केली आहे.
बाभळी बंधाऱ्याचे उद्घाटन दि.29 ऑक्टोंबर 2013 मध्ये झाले असून या दहा वर्षाच्या काळात रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपे वाढलेली आहेत. वीज पुरवठा खंडित असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही नाही,
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे केंद्रीय जल आयोग सदस्य, तेलंगाना सरकारचे प्रतिनिधी , राज्य सरकारचे अधिकारी ही त्रिस्तरीय समिती वर्षातून तीन वेळा येते व गेट वर उचलणे व खाली टाकणे हे काम करते. हे येथे नियमित येत असून या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांना देखील या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते.
दि.16 सप्टेंबर 2023रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक छ. संभाजीनगर येथे झाली असून महाराष्ट्र शासनाने 771 कोटी 20 लक्ष रुपये चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंजूर केल्याचे घोषित केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या निधीतून पाण्या खाली येणाऱ्या बुडीत शेतीचा मावेजा शेतकऱ्यांना द्यावा. शेतीला पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित करावी, बंधार्याची देखभाल करणाऱ्या यंत्रे सुरक्षा, बांधकामाला पडलेल्या भेगा, दरवाजांना लागलेलं गंज, सुरक्षा रक्षक, मुख्य सडकेला जोडणाऱ्या रस्त्याची दूरा व्यवस्था दूर करावी अशी मागणी सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समितीने केली आहे.
मा. अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ. व. कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ औरंगाबाद,जिल्हाधिकारी त्यांच्या कडे दिलेल्या निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, उपाध्यक्ष गणेशराव पाटील करखेली कर, सचिव डॉ. बालाजी कोम्पलवार, कार्यालयीन सचिव शंकरराव पाटील रोशनगावकर, सहसचिव जी.पी. मिसाळे यांनी स्वाक्षरी केली आहे,