(धर्माबाद तालुका प्रतिनिधी )धर्माबाद येथे मुस्लिम समाजाचे दोन दिवसीय इज्तेमाची सुरुवात दि.२० नोव्हें. रोजी झाली असून इज्तेमाची सांगता दि, २१ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मगरीब नमाजच्या नंतर दुवा झाल्यानंतर झाली. सदरील इज्तेमामध्ये मुस्लिम धर्मातील मौलाना व धर्मगुरू हे शांतता, समता, राष्ट्रभक्ति ,व एकतेचा वादाचा संदेश दिला.
धर्माबाद येथील बन्नाळी रोड वरील विस्डम इंग्लिश स्कूलच्या समोरच्या जमिनीवर एज्तेमाचे आयोजन करण्यात आले असून या पंचवीस हजार लोकांसाठी सभा मंडप, जेवणाची, शुद्ध पाण्याची, वाहन थांबण्याची, शौचालयाची तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखान्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात कितीतरी जास्त पटीने लोकांनी हजेरी लावली.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, उमरी, मुदखेड या चार तालुक्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील तसेच तेलंगाना सीमेवरील निर्मल व निजामाबाद जिल्हयातील मुस्लिम बांधव सहभागी होते.
इस्तेमा होत असलेल्या ठिकाणी पहिल्या दिवशी तहसीलदार शंकरराव हांदेश्वर, तसेच पोलीस प्रशासनाने एज्तेमा ची पाहणी करून येथील सेवा सुविधा बाबत समाधान केली आहे.
सदरील इज्तेमामध्ये विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच समाजामध्ये आपण कसे आचरण करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन पुणे येथील धर्मगुरु व मान्यवरांनी केले.
धर्माबाद शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी पार्किंग तसेच इतर सेवा सुविधा इजतेमासाठी येणा-या लोकांना दिली. तसेच सकल मराठवा समाजातर्फे पाण्याच्या बॉटल वितरीत करुन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले.
सदरील इज्तेमाच्या यशस्वीतेसाठी करखेली येथील नुसरत कॉन्ट्रक्टर मो.मोईजोद्दीन बिडीवाले, धर्माबाद येथील अमीरोद्दीन सेठ व मौलाना इम्तियाज सहाब यांनी मोलाचे कार्य पार पाडले.