धर्माबाद( गजानन वाघमारे)धर्माबाद येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण संभाजी तुरेराव यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार 2023 साठी नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
- हा पुरस्कार नांदेड येथील पिपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृह येथे दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे कार्यवाह बाळकृष्ण कासार ,अध्यक्ष गणेश कोळी जिल्हाध्यक्ष साहेबराव बेळे यांनी दिली आहे.
- भारतातील पहिले पत्रकार मित्र संघटन असलेल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलच्या वतीने मागील १८ वर्षापासून राज्यातील विविध पत्रकारांचा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो.त्याअनुंशगाने यंदाचा पुरस्कार धर्माबाद येथील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण तुरेराव यांची निवड करण्यात आली आहे.
- लक्ष्मण संभाजी तुरेराव यांचे मुळगाव उमरी तालुक्यातील बितनाळ येथील असून ते धर्माबादेत सन २००७ पासून नांमकीत असलेल्या प्रसिद्ध दै लोकमत ला तालुका प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट आपल्या लेखणीतून वास्तव लिखाण करतात.सामाजीक , राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व शोध पत्रकारिता बरोबर शेतकरीसह शासकीय, प्रशासन विषयी ,विविध समस्यांवर आपल्या लेखणीतून वास्तव लिखाण केले आहे, यां उत्कृष्ट पत्रकारिता कार्याची दखल घेऊन ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार 2023 साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कारासाठी लक्ष्मण तुरेराव यांची निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन, कौतुक केले जात आहे.