डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विनम्र अभिवादन…
महापरिनिर्वाणदिनानिमित्त विषेश लेख… 🖋🖌
बाबासाहेबांनी भारत भूमीवर अनंत उपकार केले आहेत. भारताला पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करणारे जगातील सर्वात महान संविधान देऊन भारताला जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही देश बनवला. सर्वसामान्य लोकांना या देशाचे मालक बनवले.बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीला खूप मार्गदर्शक आहे.शिक्षणाशिवाय या जगात काहीही शक्य नाही. आपल्या पोरांनी शिकले पाहिजे आणि मोक्याच्या जागा पटकावून समाजहीत साधले पाहिजे.असे बाबासाहेबांना वाटत. या हेतूने बाबासाहेबांनी संविधानातून मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला. या देशातील शेवटपर्यंत च्या घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे. अशी बाबासाहेबांचे मत होते.
बाबासाहेबांनी दलितांना हक्क मिळवून दिलेच पण महिला, कष्टकरी, कामगार, शोषित पिडीतांच्या हितालाही तितकेच प्राधान्य दिले आणि त्यांच्या हिताचे संविधानात कायदेही केले. वर्षानुवर्षे गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेली स्त्री. जिला शिक्षणाची दारे बंद होती. तिला ‘हिंदू कोड’ बिलाच्या माध्यमातून न्याय दिला.
तसेच कामगारांची चळवळ उभी करुन त्यांचे प्रश्न सोडविले. मूळ इथल्या मातीतला धर्म ज्याचा भारताला विसर पडला होता. तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म स्वीकारुन भारतीयांना बौद्ध तत्त्वज्ञानाचे महत्त्व सांगितले. बाबासाहेबांना जातीयता,अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, बालविवाह,अशिक्षित समाज व्यवस्था बदलायची होती.
या सर्व समाजघातक प्रवृतींना बाबासाहेबांनी संविधानातून प्रतिबंध केला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
कार्यसिद्धी झाल्यानंतर महापुरूष फार काळ देह धारण करत नाहीत. याप्रमाणे डाॅ. बाबासाहेबांनी 4 वर्षापूर्वीच आपल्या जवळचे सहकारी भाऊराव गायकवाड यांना ‘मनाची तयारी ठेवा मी आता फार काळ नाही’ असे सांगितले होते. बाबासाहेब म्हणायचे मला कधीही मरण येवो मी मृत्यू ला घाबरत नाही.
अशा या महापुरूषाला 6 डिसेंबर 1956 साली निर्वाण प्राप्त झाले.
बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांना मार्गदर्शक मानून वाटचाल करणे हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल…..
महामानवाला विनम्र अभिवादन !!
–विवेक जगताप
(मो. नं. 9112843318)