वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांचा इशारा
बुलढाणा : UGC ने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्रा द्व्यारे आर.एस.एस. प्रणित ABVP चे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचा सम्यक विद्यार्थी आंदोलना तर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला. RSS प्रणित ABVP हे संघटन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर करून त्यांचे डोके भडकवून हिंसक प्रवृत्तीचे काम करत आहेत याचे अनेक उदाहरण आपण बघितलेच आहे, गेल्या काही दिवसा अगोदर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सुद्धा ABVP च्या कार्यकर्त्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नाम फलका वरती ABVP लिहून महामानवांची एका प्रकारे विटंबनाच केलेली आहे खऱ्या अर्थाने हे संघटन फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा विरोधी काम करत आहे, असे असताना ABVP चे संस्थापक दत्ताची डिडोळकर यांचे देशासाठी कुठल्याच प्रकारचे योगदान नाही तरी सुद्धा यांची जयंती का बर साजरी करत आहे असं सुद्धा प्रश्न सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीत केला. UGC ने काढलेल्या या निर्णयाच्या विरोधात श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर, प्रा.अंजलीताई आंबेडकर व सम्यक विद्यार्थी आंदोलन मा.प्रदेशध्यक्ष तथा सल्लागार आद.महेशजी भारतीय सर यांच्या आदेशानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा कमिटी कडुन सोमवार, दिं.04 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. जर अशा प्रकारचा कार्यक्रम विद्यापीठात व महाविद्यालयामध्ये घेण्यात आला तर या कार्यक्रमाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर दिला आहे. यावेळी वंचितचे जि.महासचिव ॲड.अनिलजी ईखारे, वंचितचे बुलढाणा शहरध्यक्ष मिलिंदभाऊ वानखडे, महासचिव दिलीप राजभोज, सम्यक विद्यार्थी आंदोलन जि.सचिव राज वानखडे, जि.महासचिव रोहन पहुरकर, वंचितचे नेते गिरिशभाऊ उमाळे, सुशिल वानखडे व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.