एलएलबीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; विद्यार्थ्यांकडून ‘वंचित’चे आभार
नागपूर ,(दि. 11)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एल.एल.बी. तिसऱ्या वर्षाच्या प्रथम सेमिस्टरची परिक्षा दिनांक १९ डिसेंबर २०२३ पासून होणार असल्याचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहिर केलेले आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर परीक्षे दरम्यानचे अंतर कमीत-कमी १०० दिवस असले पाहिजे होते परंतु, विद्यापीठाने फक्त ७४ दिवसांच्या अवधीत घाईघाईत परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे सावट होते.
वंचित बहुजन आघाडीने यावर तातडीने विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आणि विद्यापीठाच्या लक्षात ही चूक आणून दिली. यावर कार्यवाही करत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रो कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले.
यावेळी ‘वंचित’चे सिध्दांत पाटील, रनर खोब्रागडे, साक्षी सिंघानिया, शिवाजी मात्रे, भावेश गोडे, राहुल भिमटे सह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.