पत्नीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जालना (दि.21) याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील सिरसगाव मंडप येथील दलित समाजातील वृद्ध रामराव सूपडाजी सिरसाट यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
त्यांच्या पत्नी यांच्या म्हणण्यानुसार, पती रामराव सुपडाजी हे श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी होते. परंतु त्यांना गेल्या एक वर्षापासून योजनेचे अनुदान मिळणे बंद झाले होते. याबाबत अलीकडे मुलगी वैशाली रामराव सिरसाट हीने तहसिल कार्यालय भोकरदन येथे चौकशी केली असता तहसिल दप्तरी मयत नोंद केल्याचे दिसून आले. हे समजताच धक्क्याने वृद्ध रामराव सुपडाजी सिरसाट यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
📝पत्नीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…
जीवंतपणी जाणीवपूर्वक मयत नोंद लावणाऱ्या तहसिल भोकरदन येथील जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व मानहाणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्नीने जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे केली आहे.