शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर आयोजित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेत सी.टी.बोरा कॉलेज ज्युनिअर संघ विजेतेपदाचा मानकरी तर विद्याधाम ज्युनिअर कॉलेज संघाने उपविजेतेपद पटकावले. या संस्थातर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सदस्य श्री धरमचंद फुलफगर, श्री राजेंद्र भटेवरा, श्री शिरीषकुमार बरमेचा, श्री राजेंद्र दुगड यांच्या हस्ते झाले. संस्थेतील विविध शाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ११ संघ सहभागी झाले होते.
शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या सर्व खेळाडू शिक्षकांनी आपले क्रिकेटमधील कौशल्य दाखवताना उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले. अंतिम सामना विद्याधाम ज्युनिअर कॉलेज व सी.टी.बोरा ज्युनिअर कॉलेज यांच्यात झाला. फायनलचा थरार पाहण्यासाठी विद्यार्थी प्रेक्षकांनी मैदानावर हजेरी लावली व शिक्षक खेळाडूंना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले. अंतिम सामन्यात प्रा.पवार सर, प्रा.फराटे सर, प्रा.जिरे सर (कर्णधार), प्रा.खेडकर सर (उपकर्णधार), प्रा.पाचुंदकर सर, प्रा.सुकळे सर, प्रा.आगळे सर, प्रा.गायकवाड सर, प्रा.बनकर सर, प्रा.औटे सर, प्रा.थोरात सर, प्रा.शेळके सर या सर्वांनी सुंदर खेळी केली. परंतु क्षेत्ररक्षणाच्या अभावामुळे अंतिम सामन्यात उपविजेतेपदावर समाधानी राहावे लागले.
या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष अनिलजी बोरा, सचिव नंदकुमारजी निकम सर, प्राचार्य कल्याणकर सर, उपप्राचार्य शेळके सर, पर्यवेक्षक कोकाटे सर, पर्यवेक्षक पाचर्णे सर व पर्यवेक्षक पर्बत सर यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य प्रा.वनवे सर, प्रा. देशपांडे सर, प्रा.शिंदे सर, प्रा.दीपक थोरात सर, मयुरेश मास्तोळी यांनी केले