दि २४ डिसेंबर
धर्माबाद तालुका प्रतिनिधी
( गजानन वाघमारे) शहरात नुकतेच काही दिसापूर्वी भव्य उद्घाटन करून राजस्थानी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी, परळी शाखा धर्माबाद बँकची सुरुवात करण्यात आली. परंतु काही दिवसातच बघता बघता राजस्थानी मल्टीस्टेट बँकेचा दिवाला निघाला असुन धर्माबाद वासियासाठी पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. काही वर्षापूर्वी बी एच आर हे बँक सुध्दा ठेवीदारांचा पैसा घेऊन पळून गेली आतापर्यंत याची भरपाई मिळाली नाही ,अजून पुन्हा दुसरा झटका धर्माबाद वासियांना ‘चोर चोर मौसेरे’ भाई ह्या म्हणी प्रमाणे राजस्थानी मल्टिस्टेट बँक सुध्दा धर्माबाद वासियाचे पैसे घेऊन उडण छू झाली आहे.पहिले राजस्थानी मल्टीस्टेट बँक हे ठेवीदाराना लुभावाण्यासाठी नव नवीन व आकर्षित करणारे स्कीम देण्यात आली.त्यांना टक्केवारी व्याजाचा नावावर डबल पैसे देण्याचे अमिष दाखविले व आपल्या बँकेत खाते उघडण्यासाठी धर्माबाद चे एजंट घेऊन रोज कलेक्शन करण्यासाठी ठेवले व ठेवीदारांना बँकेवर विश्वास यावे या साठी धर्माबाद चे संचालक मंडळ नियुक्त केले असुन राजस्थानी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकेला अता मोठा कुलूप मारलेला आहे.ठेवीदार आपले मेहनतीचे पैसे आता कोणाला मागावे तर यासाठी संचालक मंडळास संपर्क केले असता ते आता ठेवीदारांना बोलत नाही फोन सुध्दा उचलत नाही. राजस्थानी मल्टीस्टेट को – ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी, परळी शाखा धर्माबाद यांचे कडून गेल्या एक महिन्यापासून ठेवीदारांच्या रकमा देण्यास तारखेवर तारखा दिल्या जात आहेत.मुख्य शाखा पासून एकापाठोपाठ एक मल्टिस्टेट व पतसंस्था बंद पाडण्याचा सपाटा सुरू असून यामध्ये गोरगरीब, सर्वसामान्य, निवृत्त जेष्ठ नागरिक, छोटे, छोटे व्यापारी व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहे. दररोज बँकेच्या दारामध्ये प्रत्येक ठेवीदारांचे चकरा सुरू बँकेकडून ठेवीदारांना तारखेवर तारखा दिल्या जात आहेत. अनेकांच्या रोजच्या जगण्यावर याचा परिणाम झाला आहे. राजस्थानी मल्टिस्टेटचे संचालक मात्र आपापल्या व्यावसायमध्ये मग्न आहेत.आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत आता यापुढे आम्ही तारखेवर तारखा घेणार नाहीत असे एकमुखी निर्णय धर्माबाद चे ठेवीदारांनी घेतला आहे आमचे मेहनती चे आम्हाला मिळाले नाही तर आम्ही संचालक मंडळच्या दारात ठिय्या आंदोलन करू असे इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
चौकाट:
राजस्थानी मल्टिस्टेट को – ऑपरेटिव् क्रेडिट सोसायटी धर्माबाद चे ठेवीदारांना त्यांच्या मेहनतीचे पैसे तात्काळ देण्यात यावे गोर गरीब जनतेचे पैसे संचालक मंडळांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून ठेवीदारांच्या मेहनतीचे पैसे त्यांना घरी जाऊन द्यावे. महाराष्ट्रातील अनेक मल्टिस्टेट व पतसंस्था या सर्वसामान्यना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. अनेक गुंतवणूकदार देशोधडीला लागले असुन पतसंस्था व मल्टिस्टेट च्या माध्यमातून नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे या मागणी करीता मोठा आंदोलन उभारण्यात येईल.
म. मुबशिर तालुका अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती धर्माबाद.