प्रतिनिधी : पुणे
पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाला नियमबाह्य फी आकारल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जोत्सना काळे या विद्यार्थींनीने नियम बाह्य फी आकारल्याची तक्रार विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांचेकडे केली होती. या तक्रारीची विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून माफ असलेली प्रवेश फी व इतर फी वसूल करू नये, असे शासन निर्णय असताना फर्ग्युसन महाविद्यालयाने नियम बाह्य फी आकारली आहे. तसेच शिष्यवृत्ती विभागाचे अमित पालकर यांनी शिष्यवृत्ती चा अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केले नाही उलट अपमानास्पद वागणूक दिली. अशी तक्रार विद्यार्थीनीने केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. व याबाबत तीन दिवसात महाविद्यालयाच्या प्राचार्यांना स्वतः उपस्थित राहून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.