अनेक क्रांतिकारी लढ्यांच्या तुम्ही दीपस्तंभ छ. शिवाजी, संभाजी राजे तुमचंच प्रतिबिंब मुर्दाड मातीला तुम्हीच लावली क्रांतीची आग
वठलेल्या गावागावातही आली जाग स्मशानातही पेरले तुम्ही संघर्षाचे पीक जुलमी सत्तांना नाही घातली भीक गुलामीच्या मुळावरच घातला असा घावसमतेच्या रांगेत उभे केले रंक आणि राव
फुले शाहू आंबेडकरांच्या तुम्हीच प्रेरणास्थान झलकारी अहिल्या सावित्रीत तुमचाच प्राणअज्ञान आणि अंधश्रद्धेचा करूनिया बीमोड त्याग व शौर्याला दिली स्वाभिमानाची जोड
जातीजातीतील विषमतेचे मुक्त केले रानइतिहासही गाईल तुमच्या शौर्याचे गान जोवर राहील चंद्र सूर्याचं पृथ्वीशी नातं तोवर तुम्ही पृथ्वीवर असाल जिवंत तोवर तुम्ही पृथ्वीवर असाल जिवंत *
हि. रा. गवई श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा अकोला 7387651514