धर्माबाद (गजानन वाघमारे) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर इरवंता धडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाच्या धर्माबाद तालुका सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर दिनांक 14 जानेवारी2024 रोजी रा.काँग्रेसची बैठक घेण्यात आली या बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे .
याप्रसंगी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव पाटील धर्माधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. उत्तमराव सोनकांबळे,जि.उपाध्यक्ष तथा धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामचंद्र पाटील बन्नाळीकर, एडवोकेट बाळासाहेब सोनकांबळे, जि. कार्याध्यक्ष राजू वाघमारे, किशोर भुजबळ, बालाजी पाटील आलूरकर, दीपक पाटील चोळाखेकर, नरेश रेड्डी आरकलवाड, किरण पाटील बेंद्रे, नारायण पाटील पवार, सतीश पाटील शिंदे, हनुमंत पाटील किरोळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांमध्ये धडपड करणाऱ्या कार्यकर्त्याची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.