गिरीश मानव (आखिल भारतीय परिवर्तन विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी ११ वा.कैकाडी समाज मुंबई येथे आझाद मैदानात ओबीसींच्या आरक्षण वाचवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे. कैकाडी समाजाला मिळालेले आरक्षण अबाधित ठेवण्यास, प्रत्येक कैकाडी बांधवाने रक्षण करणे गरजेचे आहे. म्हणून मी स्वतः आणि आखिल भारतीय परिवर्तन विकास संस्था मार्फत प्रकाश अण्णा शेंडगे साहेब यांची भेट घेतल्याचे गिरीश मानव यांनी म्हटले आहे. केंद्रातील ओबीसी कैकाडी आरक्षण बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहे. बुद्धिजीवी लोकांनी विचार करणे गरजेचे आहे. आपण मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पण ते स्वतंत्र वेगळ्या ताटात देण्यात यावे. जेणेकरून आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितले आहे. त्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या नेतृत्वामुळे मराठ्याना व महाराष्ट्राला नवीन नेतृत्व मिळेल. मराठा समाज प्रगतीपथावर जाऊ शकतो. आजही कैकाडी समाज अत्यंत हलाखीत जीवन जगत आहे. कुठेतरी या आरक्षणामुळे कैकाडी समाजाचे किमान बोटावर मोजण्याइतके अधिकारी तरी बनलेले आहेत. बुद्धिजीवी लोकांनी कैकाडी समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सक्रीय सहभाग घ्यावा. आझाद मैदानात मुंबई येथे कैकाडी समाज प्रामुख्याने पारंपरिक वेशात पाटल्या, टोपल्या, डुक्करे घेऊन दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे येत आहे . असे आव्हान ऍड. गिरीश मानव. (आखिल भारतीय परिवर्तन विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.