मांडवगण फराटा : प्रतिनिधी
मांडवगण फराटा ता. शिरूर येथील मारुती-भैरवनाथ मंदिर व तालीम परिसर या ठिकाणी बाबासाहेब फराटे मा. पोलिस पाटील व मारुती भैरवनाथ सेवा मंडळ यांच्या संकल्पनेतून
८० फुट उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. भगव्या ‘स्वराज्य ध्वजा’चे ध्वज पूजन ह.भ.प.
दयानंद महाराज गिरी ,वारकरी भूषण ह.भ.प.सर्जेराव फराटे महाराज ,ह.भ.प.लाटे महाराज ,ह.भ.प.पल्लवी ताई गवळी महाराज,ह.भ.प. निंबाळकर महाराज व समस्त अठरा पगड जाती धर्माच्या व्यक्तीच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. गावातील समस्त ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी करून हा स्वराज ध्वज उभारण्यात आला आहे.हा समाजाला समतेची,एकतेची प्रेरणा देणारी ऐतिहासिक घटना आहे.गावा मध्ये समतेचा आणि सर्वा जाती धर्माना व बारा बलुतेदार यांना सोबत घेऊ एकोपा निर्माण करण्याचा आदर्श बाबा पाटील फराटे व
मारुती भैरवनाथ सेवा मंडळ नेहमी करत असतो.‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, आणि
चारित्र्यसंपन्न विचार आचार आपल्या दररोज जीवनात आत्मसाथ करणे हा संकल्प करावा ,छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातीतील मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली आज या सर्वांना बरोबर घेऊन ध्वजारोहण केले ही कौतुकास्पद आहे असे मत ह.भ.प.दयानंद महाराज गिरी यांनी व्यक्त केले.
इतिहासातील भगवा ध्वज हिंदूंसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना केली अशी माहिती दयानंद महाराज ,साठे महाराज यांनी दिली. स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची आपण नेहमी अभ्यासली पाहिजे असे ह.भ.प.लाटे महाराज यांनी केले आहे .
इयत्ता दुसरीतील विद्यार्थी शिव मंगेश फराटे याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा ,पराक्रमाची पहाडी आवाजात गाथा सादर केली. अगदी लहान वयात निर्धीड वक्तृत्व पाहून दयानंद गिरी महाराज यांनी सांगितले की हा चिमुकला नक्कीच इतिहास घडवेल.
मा.प्राचार्य अशोक वेदपाठक यांनी मारुती-भैरवनाथ सेवा मंडळाचे वर्षभरात होणारे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम व सदस्य यांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सरपंच समीक्षा कुरूमकर-फराटे पाटील यांनी स्वराज्य ध्वज स्थापना साठी मारुती-भैरवनाथ सेवा मंडळाचे आभार मानले.
मारुती-भैरवनाथ सेवा मंडळाचे प्रमुख बाबा पाटील फराटे यांनी सर्वांचे आभार मानले.