मांडवगण फराटा : पत्रकार
भाजप अनुसूचित जाती जमाती शिरूर तालुका उपाध्यक्ष पदी रोहितदादा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभा आणि विधान सभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या अनुषंगाने भाजपातील फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत.रोहितदादा कांबळे यांची आज भाजपा शिरूर तालुका कार्यकारणी निवड व समाज सेविका, सेवक सन्मान सोहळा मध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.भाजप चे प्रदीप दादा कंद , शिरुर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे व अनुसूचित जाती जमाती पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव, शिरूर तालुका अनुसूचित जाति जमाती अध्यक्ष किरण जाधव , शहाजी जाधव, राजेंद्र कोरेकर ,सुभाष कांडगे ,नाना पाटील फराटे ,आदेश साळुंखे ,विवेक फराटे , व सर्वच अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रोहितदादा कांबळे यांची भाजपा अनुसूचित जाति जमाती शिरूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली याची घोषणा करण्यात आली.भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा ने रोहितदादा कांबळे यांची आज निवड करण्यात आली.भाजपच्या अनेक विद्यमान नेत्यांनी या पदावर काम करून पुढे राज्यात आपला ठसा उमटवला. रोहितदादा कांबळे यांनी अनेक वर्ष समाजिक व राजकीय क्षेत्रात काम केल आहे. प्रामाणिकपणे काम केल तर अश्या अनेक मोठ्या पदावर काम करण्याची संधी फक्त भाजपा मध्येच मिळते.यापुढे पक्ष जी कामे सुचवतील ती प्रमाणिक पणे करेल अशी ग्वाही यावेळी रोहितदादा यांनी दिली.