बुलढाणा : दिं.4 फेब्रुवारी 2024, रविवार रोजी शेगांव विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन शेगाव तालुका व शहर कार्यकारिणी साठी मुलाखत कार्यक्रम घेण्यात आला. काल पर्यंत समाज गरीब होता तर चळवळ श्रीमंत होती त्या चळवळीने आजवर आमचे हक्क अधिकार अबाधित ठेवले आणि आम्हाला सन्मानच जिवन बहाल केलं आज समाज श्रीमंत झाला आणि चळवळ गरीब होत आहे अश्या परिस्थितीत आंबेडकरी व वंचित बहुजन समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन चळवळ खांद्यावर घेवुन येणारी पिढी सुरक्षित करावी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मोहीत दामोदर यांनी केले, स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे शहर व तालुका कार्यकारणी मुलाखती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या वेळी ते बोलत होते या वेळी तालुक्यांतील अनेक विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या, या कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दादारावजी अंभोरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे शहारध्यक्ष मोहम्मदभाई सलमान, युवा शहरध्यक्ष संदेशकुमार शेगोकार, नगर सेविका तथा जि.उपाध्यक्षा प्रितीताई शेगोकार, गौतमभाऊ इंगळे, युवक आघाडीचे दीपक विरघट, बोधिसत्व गवई, सम्यकचे जळगाव तालुकाध्यक्ष प्रशांत नाईक, आदित्य रामटेके , किरण शेगोकार, उदय सुरवाडे, विकी दामोदर, उमरभाई, विशाल चोपडे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन युवा नेते गिरिषभाऊ उमाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जि.सचिव राज वानखडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यकचे जि.महासचिव रोहन पहुरकर, जि.उपाध्यक्ष सिद्धार्थ शिरसाट व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.