तुझ्या पाऊलांशी माझे कोटी कोटी नमन आई.
अथांग तुझी करुणामय कहाणी किती किती लिहावी.लिहिताना कमीच पडेल ती शाई.
चंदना प्रमाणे तू झिजली,कधी अर्धपोटी खाऊनी.कधी कधी उपाशी पोटीच निजली.बाबा साहेब परदेशी जातांना तुझं काळीज करपून करपून जाई.धाई मोकळ रडाव असा तुझा उर दाटून येई.
पण, धीट मन करून आई तू बाबांना आनंदाने शिक्षण घेण्या करिता पाठवीत होतीस.घरात अन्न धान्याचे डबे सगळेच रिकामे तरी आपल्या पतीकडे शिकायत केली नाही. गरीबी जणू दारिद्य्र घेवून तुझा पाठलागच करी.सुखं काय असते कधी वाट्याला न आलेलं जीवन जगणाई रमाई.
धगधगत्या ज्वालात जणु जळत राहिली.भीम क्रांती सूर्याची नवी ऊर्जा तूच झाली.सुभेदार रामजी बाबाने आपल्या मुलासाठी खूप पारखून निरखून तुला सून म्हणून आणले अन खरचं रामजी बाबाची पारख जणू सोन्याची खानच.आज ह्या समजाला दिनदुबळ्या पीडितांच्या भवितव्या साठी तू खूप हाल अपेष्टाचे जीवन जगलीस आणि पीडितांचे शोषितांचे भविष्य उज्वल प्रखर करण्या साठी तू मात्र खुप खस्ता खाल्ल्यास आई.अंधारातून प्रकाशाकडे नेण्या साठी तूच दिली साथ.तेव्हाच आमचे बाबा भिमराया मोकळा घेई श्वास.आणि घराची जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतलीस म्हणून पुरा केला इतिहास. रमाई आणि बाबांच्या जिवनाचा करतांना अभ्यास तुम्ही.त्यांचे आपल्यावर किती उपकार आहे याची नक्कीच मिळणार हमी.पाच आपत्य झाले रमाईला त्यातले चार लेकरं आजारी पडून एक एक करून मरन पावले.त्याची मूठ माती करण्यास सुद्धा भीम हजर राहले नाही.तेव्हा ना मोबाईल ना फोन कोणास सांगेल, कशी सांगेल कसा निरोप बाबापर्यंत पोहचविणार होती. सांगा ना यांचा जरा विचार करा.रमा स्वतःच मूठ माती देत होती. तिच्या पोटच्या गोळ्याला धाई धाई रडत होती. तिचं सात्वन करायला ही कोणी नसायचं. किती वैऱ्याचे दिवस अन् वैऱ्याची च रात्र ती जगत होती.त्या सूर्याचा निखारा धगधगण्या साठी स्वतःच थिजली, सतत तिची पापने भिजली.*
सौ. मायाताई साळवे*(चिखली बुलढाणा)