धर्माबाद( वार्ताहर) नापिकी मुळे व कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियास शासन आर्थिक मदत देते. या तुटपुंजा मदतीने कुटुंबास तात्पुरता आधार मिळतो पण कायमचे स्वावलंबी बनण्यात कमतरता असते. हे लक्षात आल्यानंतर व्ही.पी.के .उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत यासाठी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम कार्यान्वित करून शेतातील पिकाचे उत्पादन कसे वाढेल? यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, आर्थिक पुरवठा करणे, शेती पूरक व्यवसाय देणे, अशा व्यवसायातून त्यांना रोजगार देणे, स्वावलंबी बनविणे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविल्याने तालुका उमरी ,नायगाव, धर्माबाद, भोकर, बिलोली, या पाच तालुक्यातील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार ४५०० शेतकरी व तरुणांना रोजगार मिळाल्याने आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे व स्वावलंबी झाल्याने त्यांची कुटुंब सुधारले आहेत.
व्ही. पी. के. उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळी गुरुजी यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे शिबिर घेऊन ऊस उत्पादनाची माहिती दिली. पारंपारिक पद्धतीची शेती सोडून आत्यआधुनिक तंत्रज्ञानाची शेती केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. बेरोजगारांना काम मिळाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दूध डेअरी व सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेकडो तरुणांना काम मिळालेले आहे. गुळाचा कारखाना व साखर कारखान्याचे कामगारांचे, ट्रक व ट्रॅक्टर चालविणारे कामगार, शेतकऱ्यांच्या उसाचे योग्य दराने पैसे वेळेवर देणे, वेळेवर ऊस तोडणी करणे, या कारणाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये एकरी उसाचे जास्त टन उत्पादन काढण्याची स्पर्धा लागली आहे. एकरी 100 टन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यास बक्षीस ठेवलेले आहे. एकरी 100 टन उत्पादन काढण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (म्हणजे व्ही. एस .आय. पुणे) इथे दि.१५ जुलै २०२४ रोजी चौथी 35 शेतकऱ्यांची बॅच प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे. शेतकऱ्यांसाठी असे अनेक उपक्रम कार्यान्वित केल्याने शेतकरी आता कर्ज बाजारी व नापिकीमुळे आत्महत्या करण्यापासून दूर जात आहे असे चित्र निर्माण झाली आहे. विकास कशाला म्हणावं हे सांगत असताना मारोतराव कोळी गुरुजी म्हणतात”शेतकरी असो की बेरोजगार असो उत्पादन क्रयशक्ती वाढली पाहिजे तर कुटुंब सुखी होते. ज्या कामापासून काहीही उत्पादन मिळत नाही त्याचा विकास कसा होईल ?असाही सवाल मारोतराव गुरुजी करतात.