मराठी पत्र
धर्माबाद (ता.प्रतिनिधी) येथील मराठी पत्रकार संघाच्या विद्यमान तालुका कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यामुळे दिनांक 17 जुलै 2024 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन अध्यक्षपदी सुदर्शन वाघमारे, उपाध्यक्षपदी गिरमाजी सूर्यकार तसेच सचिवपदी गणेश वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पत्रकार संघटना म्हणून मराठी पत्रकार संघटनेची ओळख आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या आदेशावरून व नांदेड जिल्हा संघटक ज्येष्ठ पत्रकार जी. पी. मिसाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी धर्माबाद तालुका अध्यक्ष लक्ष्मण तुरेराव यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी ची निवड खालील प्रमाणे आहे- अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, उपाध्यक्ष-गीरमाजी सुर्यकार, सचिव- गणेश वाघमारे, सहसचिव सौ.मीना राजू भद्रे, कोषाध्यक्ष सय्यद ईलियास, तालुका संघटक लक्ष्मण तुरेराव, प्रसिद्धी प्रमुख लक्षण पाटील सुर्यवंशी, सल्लागार बालाजी कुदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सदस्य माधव हानमंते, किशन कांबळे, सय्यद साजिद, म.मतीन, गजानन वाघमारे, गणपत जटाळकर आदी उपस्थित होते. नूतन कार्यकारणी वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.