पुणे जिल्हा रीटेल व्यापारी संस्था ही व्यापारी संघटना ही विविध प्रकारचे सर्व परवानाधारक व्यापारी वर्गा साठी काम करनारी संघटना आहे. ही संघटना तालुका तसेच जिल्हा त्यानंतर महाराष्ट्र व्यापारी संघटना व देशव्यापी राष्ट्रीय संघटना कॅट शी जोडलेली आहे. संघटना छोट्या मोठ्या विविध प्रकारच्या सर्व व्यापारी वर्गाच्या व्यवसाया संदर्भातील सर्व प्रकारच्या अडचणी सोडवून त्यांना योग्य सहकार्य व योग्य कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आग्रेसर आहे. तसेच संघटनेने येथुन मागे व्यापारी वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने तोडगा काढलेला आहे आणि हा तोडगा काढत असताना कोठेही अशांतता पसरेल किंवा कोणताही तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली, वेळो वेळी व्यापारी वर्गाच्या हक्कासाठी तसेच होणाऱ्या अन्यायाविरुद्ध यशस्वी आंदोलने ही केली, २०१४ चे एल बी टी आंदोलन, विविध कंपन्यांमकडून कमीशन वाव आंदोलन, अतिक्रमण, अन्नधान्य प्रशासन, काटा वेध मापण विभाग, प्लास्टिक वापारा संदर्भात होणारी कारवाई, दादागिरी, खंडणी, माथाडी, कोयतागैंग, वर्गणी, संदर्भात आंदोलन केले आहे तसेच ऑनलाईन फसवणूक, ऑनलाइन बिजनेस, Whatsapp बिजनेस एज्युकेशन, फायनान्शियल सपोर्ट, सायबर क्राइम, दुकाणात होणारी चोरी, दरोडा, नेटवर्किंग बिजनेस, शेअरिंग बिजनेस संदर्भात तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहेत, तसेच संघटनेच्या माध्यमातून वारकरी फराळ वाटप अन्नदान, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, महापुरुष जयंती, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, जेष्ठ नागरिक मेळावा, आनाथ आश्रमातील मुलांन समवेत कार्यक्रम, दिवाळी फराळ वाटप, पोलीस प्रशासन सोबत बंदोबस्त व रात्रीची गस्त, वाहतूक व्यवस्था, सण ऊत्सव निमित्त चहा, नाष्टा, भोजण व्यवस्था, गोशाळेत चारा उपलब्ध करून देणे, होलसेल भावात माल उपलब्ध करून देणे, महीलांना व्यवसायात मार्गदर्शन व सबलीकरण, विवध कार्यशाळा, करोना काळात सॅनिटायजर कॅप स्टॅन्ड, मास्क हॅन्डग्लोज औषधोपचार मोफत लसीकरण करण्यात आले आहेत.संघटना दर वर्षी २५ मे व्यापारी दिनानिमित्त भव्य असा व्यापारी मेळाव्याचे आयोजन करते आणि हे सर्व करत असताना सर्वांचे सहकार्य, सहभाग, योग्य मार्गदर्शन आणि आपला महत्वपूर्ण वेळ अतिशय आवश्यक आहे. संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार, जेष्ठ उद्योजक, उत्कृष्ट महीला व्यापारी पुरस्कार, युथ बिजनेस आयकॉन, उत्कृष्ट व्यापारी संघटना पुरस्कार, व्यापारी कृतज्ञता पुरस्कार, उत्कृष्ट व्यापारी कार्यकर्ता पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, व्यापारी वर्गाला सहकार्य करतात त्यांना सम्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येते, तसेच अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येते, संघटना पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तसेच सर्व शहरांच्या त्या त्या विभागात जवळपास २७० च्या वरती शाखा आहेत, तसेच पुणे जिल्ह्यातील साधारण ३ लाखाच्या घरात व्यापारी सद्यस्य आहेत. ” संघटनेचे दरवाजे सर्व परवानाधारक व्यापारी वर्गाला खुले आहेत, छोट्या टपरी पासुन ते आलिशान मॉल पर्यंत सर्व प्रकारचे व्यापारी वर्गासाठी स्थापन केलेल्या संघटनेत सामील व्हा असे आव्हान शिरूर तालुका कार्याध्यक्ष हरी फराटे यांनी केले आहे.” “पुणे जिल्हा रीटेल व्यापारी संघ हा छोटे मोठे सर्व प्रकारचे व्यवसायीक यांच्या साठी काम करते, शासकीय निमशासकीय कायदेशीर सहकार्य तसेच वर्ष भर होणारे सन ऊत्सव जयंती शासकीय विभागाकडून होणारा त्रास या संदर्भात मार्गदर्शन व कायदेशीर संरक्षण देण्याचे काम ही संघटना करते, व्यवसाय करताना लागणारे सर्व प्रकारचे टॅक्स व परवाना / परवानगी तसेच केंद्र शासन व राज्य शासन संबंधित कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येते तसेच या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन स्थानिक संघटनेची बांधनी, स्थापना किंवा सक्षमीकरण. संघटनेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, काटा वेध मापण विभाग, अन्नधान्य प्रशासन, ग्रामपंचायत, नगर पालिका, परीषद (अतिक्रमण, आरोग्य, प्लास्टिक, आकाश चिन्ह) प्रशासन यांच्या सोबत मार्गदर्शन करण्यात येणार.ऑनलाइन सायबर फसवणूक, ऑनलाइन बिजनेस, शेअरिंग बिजनेस, Whatsappबिजनेस एज्युकेशन, फायनान्सियल सपोर्ट, प्रोजेक्ट फाईल, नेटवर्किंग बिजनेस संदर्भात मार्गदर्शन.खंडणी, माथाडी, दादागिरी, तोडफोड करून दहशत निर्माण करून व्यापारी वर्गाला जो त्रास होतो त्या संबंधित कायदेशीर मार्गदर्शन.संघटनेच्या माध्यमातून वर्षभरात पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या संदर्भात संघटनेच्या अंतर्गत सोमवार दि २९/७/२४ रोजी एक मोठी मीटींग आयोजित करण्यात येणार आहे, मिटींग साठी शिरूर तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाने (शिरूर, शिक्रापुर, रांजणगाव, मांडवगण, न्हावरे, कोरेगाव भिमा, कारेगाव, पाबळतळेगाव, सनसवाडी, शरदवाडी. केंदुर, टाकळी हाजी, वडू बुद्रुक, कोंढापुरी) उपस्थित राहावे ही विनंती या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केले आहे.