धर्माबाद (वार्ताहर) येथील हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सौ. लक्ष्मीकांता रामचंद्र बिंगेवार – तानूरकर या आपल्या 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक 31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सौ बिंगेवार हया अतिशय विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. स्काऊट गाईड, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम अशा प्रत्येक शालेय कार्यक्रमात त्या हिरहिरीने भाग घेत होत्या. स्काऊट गाईडच्या माध्यमातून त्यांनी अनेक कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्त पानसरे मेमोरियल स्कूलचे अध्यक्ष राम पाटील बन्नाळीकर, सचिव विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम. एन. मठपती, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच हुतात्मा पानसरे हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मुख बेंबरेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ बिंगेवार यांना पुढील जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.