दि. 31 / 7 /2024 .
सहसंपादक – रोहन मोकळ
नाशिक/येवला : येवला शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येथे अनुसूचित जातीतील सुरक्षारक्षक नेमावा याकरिता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे येवला तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने विविध आंदोलने, उपोषण हे येवला शहरात व मुक्ती भूमीवर करण्यात आले होते. अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत येवला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमीवर अनुसूचित जाती-जमातीतील सुरक्षारक्षक नेमला गेला आहे. येवला मुक्ती भूमीवर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील सुरक्षारक्षक नेमावा आणि तो सुरक्षारक्षक इतर प्रवर्गातील भरल्या गेल्यामुळे स्वारीचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 दिवस आमरण उपोषण केले. वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार केला गेला. त्यांना याबाबतचे प्रशासनाकडून लेखी आश्वासनही देण्यात आले परंतु राजकीय दबाव या ठिकाणी वापरण्यात आला आणि पुन्हा तो सुरक्षारक्षक तेथे नेमण्यात आला. परंतु श्री. महेंद्र पगारे आणि त्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा संघर्ष करत मोर्चा आंदोलने उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठवला गेला. त्यांची मागणी योग्य असल्या कारणामुळे तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. तसेच समाजातील विविध लोकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. अधिकाऱ्यांनी देखील सखोल चौकशी केली. त्यावेळी जीआर (GR) मध्ये स्पष्टपणे नमूद केले गेले होते की, सदरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमीवर अनुसूचित जाती/जमातीचे सदस्य सुरक्षा रक्षक म्हणून असली पाहिजे. आणि त्या जीआर (GR)चा अधिकाऱ्यांनी योग्य ठिकाणी वापर केला. आणि वेगळ्या प्रवर्गातील नेमलेला सुरक्षारक्षक हा हटवला असून अशा प्रकारचे लेखी पत्र स्वारीचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांना अधिकाऱ्यांनी दिले. आणि त्या ठिकाणी आज अनुसूचित जातीचा कर्मचारी त्या ठिकाणी नेमला आहे. त्यामुळे तमाम आंबेडकरी समाजामध्ये आज आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे स्वारीचे अध्यक्ष महेंद्र पगारे यांनी सांगितले. तसेच त्यांनी या प्रकरणात सर्व मीडिया पत्रकारांचे देखील सातत्याने दखल घेत असल्यामुळे त्यांचे देखील आभार मानले आहे.