रत्नाळी जामा मस्जिद चे अध्यक्ष (सदर) आबेद अली यांचि पत्नि अहेमदी बेगम माझी नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा यांचे दि.30 जुलै 2024 रोजी नांदेड येथे होस्पिटल मध्ये उपचार दरम्यान 11:30 सुमारास निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे अंदाजे वय 68 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती, पाच मुले, एक मुलगी जावई सुन व नातवंड असा मोठा परिवार आहे.
रत्नाळी येथील रहिवासी असलेले अहेमदी बेगम आबेद अली यांची अत्यंत मितभाषी अशी ओळख होती. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ते ख्यातकिर्त होते.
खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती.
राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते त्याचबरोबर प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध होते.
त्यांना त्रास जाणू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांच्या पार्थिव रत्नाळी आज बुधवार दि.31 जुलै 2024 रोजी
साकाळी नऊ वाजता रत्नाळी येथील कब्रिस्तान येथे
दफनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले वाजिद अली आबेद अली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदपवार गट) अल्पसंख्याक सेल अध्यक्ष याची मातोश्री होते.