दि.0१/०८/२०२४
येवला: स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अंगणगाव येथील वाचनालयात सकाळी 11 वाजता पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे जेष्ठ नेते माणिकभाऊ शिंदे सहकार नेते अंबादास बनकर कृ.उ.बा.समितीचे संचालक महेश काळे उपसरपंच नितीन बनकर याच्या प्रमुख उपस्थितीत स्वारीपचे शहर उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली. माणिकभाऊ शिंदे आणि महेंद्र पगारे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी महेंद्र पगारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर अनेक प्रसंग सांगुन मार्गदर्शन केले जेष्ठ नेते माणिकभाऊ शिंदे यांनी फुले शाहु आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश देत शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता महापुरुषांच्या विचाराने चला प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही दरवर्षी 10 गरिब मुलांचा शालेय साहित्य खर्च करणार असल्याचे जाहीर केले तसेच बाळासाहेब आहीरे अतुल धिवर ,आशा आहेर यांची देखील भाषणं झाली.
पक्षाच्या वतीने गोर गरिब गरजू 104 विध्यार्थाना वह्या पेन चे वाटप करण्यात आले तसेच गरिब निराधार महिलांना साडी वाटप करून अल्पोपाहार देत मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. स्मिताताई झाल्टे यांनी केले तर आभार प्रशांत वाघ यांनी मानले.यावेळी विजय घोडेराव, बाळासाहेब आहिरे, सुरेश खळे,विनोद त्रिभुवन,किरण जाधव सर,गोकळ वाघ सर,प्रशांत वाघ, अतुल धीवर, सचिन खैरनार ,नाना पिंपळे,आकाश मोरे,बजरंग त्रिभुवन, मयूर गायकवाड, नितीन जाधव, सौरव कांबळे, सुखदेव त्रिभुवन, अमोल निकम, ऋषिकेश खुडे, विजय गायकवाड, उत्तम खैरनार, संजय त्रिभुवन,सौ.आशा आहेर, सौ. अँड स्मिता झाल्टे,सौ.ज्योती पगारे,सौ.लक्ष्मी त्रिभुवन,शशिकला त्रिभुवन,सुनिता राजगिरे, कविता वाकळे,सखुबाई त्रिभुवन,लताबाई खैरनार,यांच्या सह अनेक महीला पुरुष व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
