येवला/ विखरनी : आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विखरनी येथे मा. श्री. कुणाल भाऊ दराडे यांनी शाळेला भेट दिली. तसेच शाळेला व शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक संच व एक प्रिंटर भेट दिले. सदर संगणक संच मा. शिक्षक आमदार श्री.किशोर भाऊ दराडे यांच्या संकल्पनेतून व कुणाल दराडे फाउंडेशन येवला यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी स्वतः कुणाल दराडे फाउंडेशन चे संस्थापक श्री.कुणाल दराडे व समवेत त्यांची पूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी कुणाल दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक श्री.कौतिक नाना पगार यांच्या हस्ते श्री. कुणाल दराडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री. कुणाल दराडे यांच्याकडून ग्रामसेविका सौ. छाया ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विखरणी गावातील ग्रामस्थ श्री.कौतिक नाना पगार (ज्येष्ठ समाजसेवक), श्री.भागवत शेलार सर (वि वि का सोसायटी संचालक), श्री.श्रीहरी खरे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), श्री.भिमाजी खरे (ज्येष्ठ कलावंत), श्रीमती छाया ठाकरे मॅडम (आदर्श ग्रामसेविका), श्री.अमोल खरे (नांदगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्ष), श्री.जनार्दन गोडसे ग्रामपंचायत सदस्य, श्री. जालिंदर शेलार ग्रामपंचायत सदस्य, अनिल खरे ग्रामपंचायत सदस्य, रमेश शेलार कुणाल दराडे फाउंडेशन शाखाध्यक्ष, बाळासाहेब खरे अध्यक्ष, अरुण खरे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, रवी रोठे, गोपीनाथ बिडगर मा. ग्रामपंचायत सदस्य, सोमनाथ खरे, प्रमोद खरे, वाल्मिक शेलार, गोरख अहिरे मा. तंटामुक्ती अध्यक्ष, अक्षय रोठे शिवसेना शाखाप्रमुख, केशव पगार, जगन्नाथ कदम, कैलास सुळ, बाबा भिसे, रत्नाकर शेलार, संजय खुरसने, योगेश कदम, नागनाथ शेलार, विठ्ठल शेलार, दीपक भड, शुभम मोकळ, शालेय शिक्षक राहुल कदम मुख्याध्यापक सर, पवन पगार सर, अंगणवाडी सेविका रश्मी शेलार तसेच शालेय विद्यार्थी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल कदम यांनी केले .श्री कुणाल भाऊ दराडे यांचे स्वागत श्री सागर शेलार यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. पवन पगार यांनी केले.